पान:हिंन्दू सम्राट्.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समूाट् गौतमीपुत्र शातकणों.

(२५)

आता शातकणींच्या ताब्यांत आली असून, त्या भिक्षुकडेच ती पूर्ववत् दान म्हणून चालु राहील.” ह्या लेखावरून सम्राट् गौतमीपुत्र याने मिळविलेला विजय आणि स्वत: हिंदु असूनही, बौद्धांशीं वागण्याची उदारता व दानशीलता इत्यादि गोष्टी कळून येतात. ह्याच लेखाखाली राजमाता 'गौतमी वालश्री' हिचाही एक लेख (दानपत्र) आहे. त्यामध्ये ती म्हणते-

 "गौतमीपुत्र शातकणीं ह्याचे राज्यांत राजपुताना, गुजराथ, उत्तर कोकण वगैरे प्रदेश गणले जात आहेत. ह्या राजाने राजपुतान्यांतील क्षत्रियांना नमविलें आणि शक, पल्हव (पर्शियन) इत्यादिकांचा नाश केला. क्षहरात वंशांतील राजा नहपान ह्याजवर विजय मिळवून शातवाहन वंशाला मोठी कीर्ति प्राप्त करून दिली......."

 हा लेख त्याच्या कारकिर्दीच्या चोविसाव्या वर्षी लिहिला गेला असून, त्यामुळे त्याचा पराक्रम व राज्यविस्तार ह्यांची कल्पना येऊं शकते.

 शकांवरील त्याचा विजय विशेष महत्वाचा असल्यामुळे त्यांचें द्योतक म्हणून शकराजा 'नहपान' ह्याचे नाण्यांवर आपले . नवीन शिक्के मारून 'गौतमीपुत्र शातकर्णी' ने तीं नाणीं चालू केलीं. त्यांचेवर 'धनुष्य-बाण' मुद्रित केला असून खरोष्टी लिपींतील पूर्वीचीं कांही अक्षरें आहेत. तसेंच ब्राह्मी लिपीमध्ये ‘रायो गोतमी पुतस सिरेि सातकणिास असे शब्द दुस-या बाजूला आढळतात. हीं बहुतेक नाणीं चांदीचीं असून, नाशीकजवळ मिळालं आहेत. ह्यांखेरीज शकांवरील विजयापूर्वीचींही त्याचीं नाणीं सापडली असून तीं गजचिन्हांकित आहेत.

 नहपानच्या नाण्यांमध्ये त्याने वरीलप्रमाणे स्वतःच्या विजयाचा निदर्शक बदल केला असला, तरी त्याचीं दानें-देणग्या वगैरे बौद्ध भिक्षूंकडे पूर्ववत् चालविलीं होतीं, हें वरील शिलालेखांवरून उघडच दिसत आहे.  महाराष्ट्रांतील कालगणनेचा प्रसिद्ध 'शालिवाहन शक' हा त्याच्या