पान:हिंन्दू सम्राट्.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२४)

हिन्दुस्थानच हिन्दु सम्राट्.

माहिती देऊन आंध्रराजांचें केवळ स्मरण केलेलें आढळतें. इतकेंच नव्हे तर 'अनेक हिंदु राजघराण्यांमध्ये आंध्र किंवा शातवाहन नांवाचें एक घराणें होऊन गेलें, 'अशा एका ओळींतच चारशे वर्षे राज्य केलेल्या ह्या घराण्याची बोळवण एका मोठ्या ग्रंथकाराने केली आहे ! हें अज्ञान कीं अनास्था ?

 मत्स्य, वायु, ब्रह्मांड वगैरे पुराणांवरून ' आध्र' राजांसंबंधी थोडीशी माहिती मिळते. आंध्रराजांचे कांही शिलालेख व नाणींही सापडलीं असून, त्यांवरून ह्या घराण्याचा बराच साधार आणि क्रमबद्ध इतिहास लौकरच प्रकाशांत येईल, असें वाटतें. बंगालच्या उपसागराला लागून कृष्णा व गोदावरी ह्या नद्यांमध्ये 'आंध्र' किंवा 'तैलंगण' देश आहे. त्यामध्ये 'धनकटक' येथे 'शातवाहन' राजांची राजधानी होती. मि० स्मिथ ह्यांचे मताने ' श्रीककुलम्' हीच शातवाहन किंवा शातकर्णी राजांची राजधानी होती. कांही काळाने ह्या राजांचें राज्य पश्चिमेकडे महाराष्ट्रांत प्रसार पावल्यानंतर गोदावरीच्या काठीं 'प्रतिष्टानपूर' ऊर्फ पैठण ही राजधानी झाली. मोंगलांच्या दिल्ली-आग्रा किंवा इंग्रजांच्या कलकत्तादिल्ली ह्या राजधान्यांप्रमाणे हा फेरबदल झाला असावा. आंध्र देशांतील ह्या 'शातकर्णी' घराण्यांत एकंदर तीस राजे होऊन गेले आणि त्यांनी सुमारें चारशे वर्षे राज्य केलें. त्यांमध्ये सिमुक, कृष्ण (कन्ह), हाल, गौतमीपुत्र शातकर्णी, पुलुमायी व गौतमीपुत्र यज्ञ शातकर्णी, इत्यादि राजे प्रसिद्ध होत.

 सम्राट् गौतमीपुत्र शातकणीं हा फार पराक्रमी राजा होऊन गेला. अशोकानंतर झालेल्या राजांमध्ये ह्याचा दर्जा फारच मोठा मानला जातो. ह्याच्या वेळचे कांही शिलालेख नाशिक व कालें येथे सापडले असून, ते त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी लिहिलेले आहेत. नाशिकच्या लेखांत प्रका दानाचें वर्णन असं आहे की, "क्षत्रपवंशी नहपानाच्या जावयाच्या अधिकारामध्ये असलली जी जमीन त्याने पूर्वी भिक्षून दिली होती, ती