पान:हिंन्दू सम्राट्.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (२३)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राटू.
(३) सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी

 पाट लिपुत्र येथील मगध साम्राज्यावरील 'मौर्य' राजांची सत्ता कम जोर झाल्यानंतर तेथे 'शुंग' कुलाची सत्ता स्थापन झाली. शुंग घराण्याचा संस्थापक 'पुष्यमित्र' ह्याने सोडलेला 'अश्वमेध' यज्ञाचा घोडा (पार्थियन) ग्रीकांचा राजा 'मिनांडर' ह्याने अडविला. अर्थात आपल्या साम्राज्य-सत्तेला हें एक युद्धाचें आव्हानच आहे असें समजून पुष्यमित्राने ग्रीकांशीं मोठं युद्ध केलें. त्यांत ग्रीकराजा 'मिनांडर' ह्याचा पूर्ण पराभव झाला. थंड देशांतील गो-या लोकांचा आमच्या हिंदु सम्राटांनी पराभव केल्याचें हें दुसरें उदाहरण होय ! चद्रगुप्त (मौर्य) राजाने सेल्युकसला चति केल्याचें वर्णन मागे आलेंच आहे. पाटलिपुत्र येथे शुंग आणि कण्व वंशांतील राजांनी सुमारें दीडशे वर्षे राज्य केल्यानंतर (ख्रिस्तपूर्व २८) आंध्र देशांतील 'शातकर्णी' राजांनी आपली सत्ता स्थापन केली; परन्तु त्या राजाचें नांव निश्चित समजत नाही. शातकर्णी किंवा शातवाहन वंशांतील तो बारावा किंवा तेरावा पुरुष असावा, असें मि० हिन्सेट स्मिथ ह्यांचें मत आहे. उत्तर हिंदुस्थानांत स्वारी करून तेथे आपलें वर्चस्व स्थापन करणारा 'शातकर्णी' हा पहिलाच 'दक्षिणी ' राजवंश होय ! ह्याच गोष्टीची अभिमानास्पद पुनरावृत्ति मालखडच्या राष्ट्रकूटांनी आणि कृष्णाकाठच्या मराठ्यांनी केली. तें वर्णन क्रमाक्रमाने पुढे येईलच.

ह्या 'शातकर्णीं' राजवंशाचा सुसंगत व साधार असा इतिहास अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. 'हिंदुस्थान देशाचा इतिहास' असें नांव धारण करणा-या अनेक पुस्तकांतून जेमतेम दहापंधरा ओळींतच थोडीशी