पान:हिंन्दू सम्राट्.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२२)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

ब्लामभूत असा 'राजर्षि' अशोक 'ह्याचें 'राजगृह' येथे निर्वाण झालें !

 सम्राट् अशोकाच्या पश्चात् त्याचें साम्राज्य सुमारें पन्नास वर्षे 'मौर्य' घराण्याकडे चाललेलें होतें. त्याच्या साम्राज्यामध्ये 'चंद्रगुप्ता' पासूनच गांधार (अफगाणिस्थान), बलुचिस्थान ह्यांचाहि समावेश होत होता. दक्षिणेकडे पेन्नार नदीपर्यंत त्याची साम्राज्यसत्ता चालत असे (नकाशांत पहा). अशा प्रकारें अफाट राज्यविस्तार आणि अतुल वेभव ह्या बाबतींत तत्कालीन सर्व राजांहून अशोक श्रेष्ठ होता ! ह्या बाबतींत अर्वाचीन काळांतील औरंगजेब बादशहा कदाचित् त्याची बरोबरी करूं शकेल; परन्तु प्रजेची सुखशांति आणि सन्तुष्टता तसेंच वैयक्तिक नीतिमत्ता व सौजन्य इत्यादि सद्गुणांच्या दृष्टीने औरंगजेबापेक्षा अशोकाची योग्यता फारच मोठी आहे. म्हणून हिंदू पद्धतीप्रमाणे 'राजर्षेि' अथवा पाश्चात्य चालीप्रमाणे 'दि ग्रेट' हें उपपद सम्राट् अशोकाला अगदी सार्थ होय!