पान:हिंन्दू सम्राट्.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राद अशोक.

(२१)

थोडासा भेद आढळतो. लेखांची लिपि बहुतेक ठिकाणीं ब्राह्मी (नागरी) असून कांही लेखांमध्ये खरोष्टी लिपीचा उपयोग केलेला आहे. असे अशोकाचे अनेक लेख आहेत. त्यांवरून त्याचा राज्यविस्तार आणि लोकोपयोगी कामें वगैरे माहिती मिळते. काश्मीरमध्ये श्रीनगर (पाडरेथन) आणि नेपाळमध्ये ललितपट्टण ह्यांसारखीं नवीन सुंदर शहरेंही त्याने वसविलों होंतीं.

 चंद्रगुप्तापासून ग्रीक लोकांशीं आलेला आंतरराष्ट्रीय सम्बन्ध, बेंदुसार व अशोक यांचे वेळींही चालू होताच. मेगॅस्थिानीसनंतर 'डायमेचस्' नामक ग्रीक वकील मगधाचे राजदरबारीं रहात असे. इजिप्सचा राजा 'टालेमी फिलाडेल्फस्' याजकडून 'डायोनिसिअल' हा वकील हिंदुस्थानांत आला होता. इजिप्त, मासिडोनिया, सीरिया अफगाणिस्थान, ब्रह्मदेश, सिंहलद्वीप वगैरे देशांत त्याने आपले धर्मप्रचारकही पाठविले होते. त्यांनी तेथे पुष्कळ अनुयायी बनवून धर्मप्रसार केला. ‘थेरापूटस्' आणि 'एसेनीजू' सारख्या ग्रीकांच्या विद्वानांवरहि बौद्ध मतांचा प्रभाव पडला होता. अशा प्रकारें त्या प्राचीन काळीं इतर देशांशीं भारतीयांचें चांगलें दळणवळण असे.

 राजसत्तेचा 'बडगा' न दाखवितां मतपरिवर्तनाच्या मार्गाने अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची पराकाष्टा केली. ख्रिस्तपूर्व २४९ सालीं तो 'बौद्ध' धर्माप्रमाणे यात्रेस निघाला. प्रथम बुद्धाचें जन्मस्थान (लॅबिनी उद्यान) येथे गेला. तेथे एक स्तंभ स्थापून तो कपिलवस्तु येथे गेला. नंतर श्रावस्ती आणि काशी (सारनाथ) क्षेत्रांची यात्रा करून त्याने गयेच्या 'बोधि' वृक्षाचें दर्शन घेतलें. शेवटीं नेपाळमधील 'कुशी' क्षेत्रीं जाऊन त्याने यात्रा पूर्ण केली. नंतर ख्रिस्तपूर्व २४० सालीं संन्यास-भिक्षु-वस्त्रें घेतलीं आणि आठ वर्षांनंतर भारताला