पान:हिंन्दू सम्राट्.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१८)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

स्वार आणि सातशे हत्ती एवढे सैन्य सज्ज होतें. अर्थातच दोघांचा घनघोर संग्राम झाला. शेवटीं अशोकाचा विजय झाला ! परन्तु त्या युद्धामध्ये जी भयंकर प्राणहानि झाली, ती पाहून कोमल स्वभावाच्या अशोकाचें हृदय द्रवलें आणि युद्धकर्माविषयी त्याला उद्वेग वाटूं लागला ! कोठे सम्राट् अशोक आणि कोठे जित लोकांच्या कत्तली करून त्यांच्या मुंडक्यांचे मनेरे बांधणारा पाषाणहृदयी जगज्जेता तैमूरलंग !

 क्रमांक १३ च्या शिलालेखांत आपल्या वंशजांना त्याने केलेल्या आज्ञेवरून त्या वेळच्या त्याच्या मनःस्थितीची कल्पना होते-

 "एतायेचा अथोय इय धंमलिपिलिखिता किति पुता पापोता मे अ... सवं विजयमविजयंत वियमविजयंत वियमनिषु षयकपिनो विजयषिखंति चालहु दंडताचालोचेतु तमेव चाविजयं मनतु ये धमविजये।"

 (संस्कृत भूपांतर) -‘एतस्मै चार्थायेयं धर्मलिपिर्लिखिता किमिति पुत्राः प्रपौत्राः मे ( शृणुयुः ) सर्वविजयं मा विजेतव्यं मन्येरन शराकर्षिणे। विजये शांर्ति च लघुदण्डतां च रोचयन्तां तमेव विजयं मन्यन्तां यो धर्मविजयः ।

 अर्थात ह्यासाठी हा धर्मलेख लिहिला गेला आहे की, विशेषतः माझ्या वंशजांनी ही हकीकत ऐकावी आणि युद्धविजय वाईट समजून सोडून द्यावा. जेव्हा बाण सोडणें जरूर होईल, तेव्हा शक्य तितकी सौम्यता बाळगावी आणि धर्मविजय हाच खरा समजावा.

 अशा रीतीने युद्धांतील हत्याकांडामुळे द्रवलेलें अशोकाचें अन्तःकरण साहजिकच × पुढे अहिंसावादी बौद्धधर्माकडे वळलें. मि० व्हिन्सेंट स्मिथ× राज्यप्राप्तीनंतर तीन वर्षांनी हें मतांतर झालें; असेंही कोणी म्हणतात.