पान:हिंन्दू सम्राट्.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१७)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.
(२) सम्राट अशोक
( ख्रिस्तपूर्व २७२ पासून ख्रिस्तपूर्व. २३२)

 मागील प्रकरणांत लिहिल्याप्रमाणे सम्राट् 'बिंदुसार' पाटलिपुत्र येथील सिंहासनावर विराजमान झाल्यावर त्याने पंचवीस वर्षे साम्राज्याचा कारभार पाहिला. त्याच्या राजत्वकालामध्ये (कारकिर्दीत) दक्षिणेकडे त्याच्या साम्राज्याचा विस्तार बराच झाला. राजपुत्र अशोक हा त्या वेळीं अर्वाचीन मोंगल शहाजाद्यांप्रमाणे पंजाबप्रांतावर प्रांताधिकारी नेमलेला होता. एकदा सीमाप्रांतांतील डोंगरी लोकांनी 'बिंदुसार' ह्याचे विरुद्ध बंडाचा प्रयत्न केला होता; त्या प्रसंगीं अशेकाजवळ भरपूर सैन्याबळ असतां ही त्याचें प्रदर्शन न करितां सामोपचाराने त्याने शांतता प्रस्थापित केली. त्यामुळे त्याजवर पित्याची विशेष कृपादृष्टि झाली. अशोकाच्या अंगचे असे सद्गुण पाहून बिंदुसाराने तो वडील पुत्र नसतांही त्यालाच युवराज-पद दिलें. पुढे बापाचे पश्चात अशोकाला रीतसर मगधाचें साम्राज्य-सिंहासन प्राप्त झाले. हातीं आलेल्या राज्यवैभवाला स्थैर्य आणण्यासाठी राजवंशांतील इतर वारसदारांचा अशोकाने घातपात न करतां त्यांना मोठं वेतन देऊन ठिकठिकाणीं सरकारी प्रांताधिकारी किंवा धर्मप्रचारक म्हणून त्यांची योजना केली. क्रमांक ५ च्या त्याच्या शिलालेखावरून ही गोष्ट स्पष्ट होत आहे; त्यावरून त्याची सत्प्रवृत्ति दिसून येते.

 ख्रिस्तपूर्व २६१ ह्या वर्षी सम्राट् अशोक ह्याने कलिंग ( ओढ्या-उत्तर सरकार) राज्यावर महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन प्रचंड सैन्यानिशीं स्वारी केली. तेथील राजाजवळदेखील साठ हजार पायदळ, एक हजार घोडे-