पान:हिंन्दू सम्राट्.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१४)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्ः

 २. ग्रीकांचा वकील 'मेगॅस्थिनीस' चंद्रगुप्साच्या दरबारीं रहावा.

 ३. चंद्रगुप्साने सेल्युकसला पांचशे हत्ती द्यावे.

 अशा प्रकारचा तह कबूल करून व आपली कन्या 'हेलेन' हिचा विवाह चंद्रगुप्ताबरोबर लावून देऊन ग्रीकराजा सेल्युकस निकेटर स्वदेशीं निघून गेला!

 ह्या तहाप्रमाणे सेल्युकस् राजाचा वकील ‘मेगॅस्थिनीस' हा चंद्रगुप्ताचे दरबारांत रहात असे. त्याने लिहून ठेविलेल्या वर्णनावरून चंद्रगुप्ताची राज्यपद्धति आणि तत्कालीन देशस्तिति कळून येते. मेगॅस्थिनीस ह्यांच्यानंतरदेखील ग्रीस आणि हिदुस्थान (मगध) येथील राजांचे वकील एकमेकांकडे जात येत असत. आशा प्रकारें चंद्रगुप्ताच्या कर्तृत्वामुळे हिंदुस्थान देशाला राजकीय महत्व प्राप्त झाले होतें. अंतरराष्ट्रीय सळोख्याच्या संबंधांमध्ये पुढे 'अशोक'च्या धमोंपदेशकांनी अधिकच वाढ केली.

 भारत-सम्राट 'चंद्रगुप्त मौर्य'ह्याच्याजवळ सहा लक्ष पायदळ, तीस हजार घोडेस्वार, नऊ हजार हत्ती आणि चार हजार रथ एवढें प्रचण्ड चतुरंग दळ सज्ज होतें. त्याशिवाय एक लहानसा आरमारी विभाग असून गुप्त हेरांचेंही एक खातें होतें, त्या काळीं आरमारी लढाया झाल्या नाहीत. तरीसुद्धा सिंधु नदींतून चालणा-या व्यापाराच्या संरक्षणाला अर्थात चांचेलोकांवर दरारा बसविण्यामध्ये त्या 'जलसेने'चा उपयोग होत असें. अशा सैन्यबळावर सम्राट् चंद्रगुप्ताने बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत आपला अम्मल बसविला. अफगाणिस्तान आणि बलुचिस्थान हे प्रदेशही ग्रीकांनी तहाअन्वयें त्याला दिले होतेच.सारांश, चंद्रगुप्ताचें साम्राज्य मोंगल बादशाह अकबर ह्याच्या साम्राज्याएवढें विस्तृत व बलाढ्य होतें, असें म्हणतां येईल.

सम्राट् चंद्रगुप्त ह्याची राज्यव्यवस्थादेखील नमुनेदार होती. तो सम्राट होता, तरीही अनियंत्रितपणें वागत नसे. त्याला साह्य करणारी एक प्रजा-