पान:हिंन्दू सम्राट्.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खम्राट् चंद्रगुप्त मौर्य.

(१३)

 ख्रिस्तपूर्व ३०५ या वर्षी ग्रीक राजा सेल्युकस् निकेटर याने पंजाबमधून नष्ट झालेली ग्रीक सत्ता पुनः स्थापन करण्यासाठी हिंदुस्थानवर स्वारी केली. मगधाचा नूतन सम्राट् चंद्रगुप्त त्याच्याशीं सामना देण्याला सिद्ध होताच. शेवटीं मोठ्या निकाराचें युद्ध होऊन विजयश्रीने चंद्रगुप्ताचे गळ्यांत माळ घातली ! अनेक दृष्टींनी ह्या युद्धाचें विशेष महत्व आहे. शिकंदरच्या स्वारीच्या वेळीं 'नंद' राजांनी भारतावरील संकट जाणून वेळींच जोराने प्रतिकार करण्याची दक्षता दर्शविली नाही. पंजाबांतील शूर पौरस राजाने केलेला प्रतिकार ह्या जगजेत्या शिकंदरापुढे अपुरा ठरला. तरीहि शिकंदराने त्याच्या गुणांवर मोहित होऊन त्याचा गौरव केला. पुढे चंद्रगुप्ताने सावध राहून सेल्युकस् याला फार पुढे येण्यापूर्वीच गांठून सिंधू जवळ त्याचा पूर्ण पराभव केला. तात्पर्य, हिंदु लोक जागृत राहतील तर त्यानंही आपलें स्वातन्य-रक्षण करतां येतें, ही गोष्ट परम प्रतापी चंद्रगुप्ताने सिद्ध केली आहे.

 हिंदुस्थानची हवा उष्ण असल्यामुळे थंड देशांतील ताज्या दमाच्या लोकांपुढे आमचीं सैन्यें टिकाव धरूं शकत नाहीत, असा एक विचित्र आणि अतिशयोक्तिपूर्ण सिद्धांत आमच्या कांही इतिहासांतून ठोकून दिलेला असतो. अर्थातू जगाच्या अंतापर्यंत (विषुववृत्तानजीक आमचा देश असल्याकारणाने ) आमच्या देशाची हवा उष्ण राहणार; त्या हवेमुळे आम्ही कमकुवतच राहणार आणि मग असले आम्ही दीनदुबळे हिंदी लोक यावच्चंद्रदिवाकरौ परतन्त्रच राहाणार ! हें उघडच आहे. असल्या ह्या विचार-परंपरेची व्यर्थता वरील युद्धावरून समजू येईल. प्रस्तुतच्या चरित्राप्रमाणे पुढील कित्येक चरित्रांतून अशाच प्रकारचे कांही। प्रसंग येणार आहेतच. असो. पराभूत झालेल्या सेल्युकसने पुढील अटींवर चंद्रगुप्ताशीं तह केला-

 १. ग्रीकांनी पंजाबवर हक्क न सांगतां काबूल, कंदाहार व मकरान हे आपले प्रांत चंद्रगुप्ताला द्यावे.