पान:हिंन्दू सम्राट्.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१०)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

गावाला ‘मयूर-नगर' असें नांव दिलें. ह्याच लोकांना 'मयूर-नगर' निवासी किंवा मौर्य असें इतर लोक म्हणूं लागले. ‘चंद्रगुप्त' हा त्याच कुळांतील राजकुमार होता. पुढे 'विडूडभ' राजाच्या वंशजांनीही बरेच दिवस मैौर्यावर हत्यार धरिलें होतें. अशा संकटकालीं गर्भवती मैौर्यराणी एके दिवशीं गुप्तपणें पाटलीपुत्र येथे जाऊन राहिली. तेथेच ती पुढे प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. तोच 'चंद्रगुप्त मौर्य' या नांवाने प्रसिद्धीस आला. 'चन्दो' नामक एका विश्वासू सेवकाने राणीच्या आज्ञेवरून गुप्तपणें त्या अर्भकाला एका गवळ्याकडे नेऊन ठेविलें. तेथूनही कांहीं दिवसांनी एका शिकारी माणसाकडे त्या मुलाची रवानगी झाली.बाल चंद्रगुप्त अंमळ मोठा होऊन, आपल्या सवंगड्यांबरोबर खेळू बागडूं लागला.

"एके दिवशीं तीं मुलें ‘न्याय करण्याचा' कांही खेळ खेळत होतीं. चिमकुला चंद्रगुप्त एका उंच दगडावर बसून न्याय देण्याचें काम करीत होता. त्या वेळीं त्या वाटेने आर्यचाणक्य ह्या नांवाचा एक चतुर ब्राह्मण चालला होता. त्याच्या दृष्टीला हा खेळ साहजिक पडल्यामुळे त्याने त्या बालन्यायाधिशाविषयी अधिक चैौकशी केली. तेव्हा त्याची हुशारी पाहून त्या चाणाक्ष गृहस्थाने अनुमान केलें की, हा मुलगा पुढे कांहीतरी खास नशीब काढोल ! पुढे मोठ्या प्रयासाने त्याच्या संगोपनाची जबाबदारी पत्करून आर्यचाणक्याने चिमखड्या चंद्रगुप्ताला आपणांबरोबर एका सुरक्षित स्थळीं नेलें आणि त्याला युद्धकला व राजनीति ह्या विषयांचे शिक्षण देऊन चांगलें तरबेज केलें !"

 दुस-या कांही विद्वानांचें मत असें आहे की, चंद्रगुप्ताच्या आईचें नांव'मुरा' होतें. तिच्या नांवावरून त्याला ‘मैौर्य' नांव पडलें आणि तेंच पुढे त्याच्या घराण्याला चालू झालें.