पान:हिंन्दू सम्राट्.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(९)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राटू.
(१) समूाट् चन्द्रगुप्त मोर्य.
( ख्रिस्तपूर्व ३२२ ते २९८ )

 आपल्या हिंदुस्थान देशावर स्वारी करणा-या परकीय लोकांवर विजय मिळवून अजरामर कीर्ति मिळविणा-या आणि तद्व्दारा मायदेशालाही गौरव प्राप्त करून देणा-या अनेक हिंदु सम्राटांमध्ये चंद्रगुप्त (मौर्य) हा पहिला प्रतापी सम्राट् होय. त्याच्याविषयी, कांही बांधकामें व शिलालेख इत्यादि प्रत्यक्ष साधनांवरून बरीच माहिती मिळूं शकते. तसेंच हिंदु, बौद्ध व जैन लोकांचे अनेक संस्कृत व प्राकृत ग्रंथ 'चंद्रगुप्त' राजाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष देत आहेत. ग्रीस देशाचा प्रसिद्ध वकील 'मेगॅस्थिानीस' हा त्याचे दरबारीं रहात असे. त्यानेही ह्या भारतसम्राटा-विषयी आणि त्या काळच्या देशस्थितीविषयी सुंदर वर्णन लिहून ठेविलें आहे. एवढ्यावरून 'चंद्रगुप्त'राजाची योग्यता निदर्शनास येते; परन्तु त्याबरोबरच कित्येक ठिकाणीं तपशिलाच्या बाबतींत मतभेदही आढळतो. त्यामधून सत्य शोधून काढण्यासाठी कित्येक विद्वान् संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत, ही समाधानाची गोष्ट होय.

चंद्रगुप्ताच्या पूर्वपीठिकेविषयी एक प्रसिद्ध हिंदी चरित्रलेखक पं० रामनरेश त्रिपाठी म्हणतात-

'बौद्ध ग्रंथांवरून दिसून येतें की, गौतम बुद्धाच्या शाक्य वंशांतील एका राजावर 'विडूडभ' नामक राजाने स्वारी केली. त्या प्रसंगीं कांही शाक्य हिमालयाच्या उतरणीवरील एका चांगल्या ठिकाणीं जाऊन राहिले. या प्रदेशांत मोर फार होते. त्यामुळे त्यांनी नवीन वसविलेल्या आपल्या