पान:हिंन्दू सम्राट्.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

प्रश्नांचीं उत्तरें जर अल्पस्वल्प तरी होकारार्थी देऊं शकतील, तर रणजितसिंह, हरिसिंह किंवा शिवाजी-बाजीरावांसारखे प्रतापी हिंदु वीरच !

 असल्या इतिहास-लेखन-पद्धतीचा विस्तारभयास्तव आणखी एकच दाखला देतों. प्राथमिक शाळांतील मुलांना प्रथम आपल्या प्रांताचा अर्थात महाराष्ट्राचा इतिहास शिकविण्यांत येतो. ह्या उद्देशाने लिहिलेल्या एका प्रचलित पुस्तकामध्ये पहिल्या धड्यांत अगस्तिमुनि आणि श्रीरामचंद्रप्रभृति आर्य लोक दक्षिणेकडे दंडकारण्यांत येऊन जरा साफसूफ करून वस्ती करूं लागतात, तोंच पुढल्या धड्यामध्ये अचानक 'अल्लाउद्दीन खिलजीचा हल्ला आणि देवगिरीच्या यादवांची शरणागतेि! बिचा-या शालिवाहन किंवा चालुक्य-राष्ट्रकूटांसारख्या प्रसिद्ध राजवंशांची विचारपूसदेखील नाही ! जणू काय रामावतारानन्तर हिंदूंमध्ये कांहीच 'राम' राहिला नाही ! पुस्तक संपवितांना ग्रंथकारांनी दुस-या बाजीराव पेशव्याच्या नालायकीचें वर्णन कांही वेचक शब्दांत बरेंच दिलें आहे; परन्तु अप्टें-कोरेगावच्या लढाया व सेनापति बापू गोखल्याचें विलक्षण शौर्य आणि आत्मबालदान अशा उल्लेखनीय गोष्टींना फाटा दिला आहे ! पराभवाच्या वर्णनामध्येदेखील देशाच्या प्रतिष्ठेसाठी लढलेल्या वीरांविषयी वाचकांच्या अंतःकरणांत अनुकंपा व आदर आणि देशाविषयी कळकळ कुशल लेखकाला उत्पन्न करतां येते; ही गोष्ट गेल्या महायुद्धामध्ये चीत झालेल्या जर्मनीमधील विद्वानांच्या लिखाणांवरून सिद्ध होण्यासारखी आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासाचें अशा प्रकारें थोडे फार ज्ञान झाल्यावर पुढील वर्गातून हिंदुस्थानचा इतिहास विद्यार्थी शिकू लागतात. त्यामध्ये पठाणमोंगलांच्या झटापटी, इंग्रज-फ्रेंच वगैरे गोच्या लोकांचे चुरशीचे सामने आणि इंग्रज गव्हर्नर किंवा व्हाइसरॉय ह्यांच्या कारकिर्दी इत्यादिकांपुढे चंद्रगुस, अशोक किंवा हर्षे इत्यादि प्राचीन 'हिंदु सम्राटां’ची खबर विचारएयाला फुरसत कोणाला? तें राहूं द्या; अगदी अवाचीन काळच्या 'विजय-