पान:हिंन्दू सम्राट्.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उपोद्घात.

(३)

ठेवण्याचा हेतु ज्याच्या प्रस्तावनेमध्ये प्रदर्शित केला आहे, अशा एका 'भाषांतरित' सोज्वळ पुस्तकांत लेखक-महाशय म्हणतात की, "हिंदुस्थान देशाचा बचाव करण्याचे कामीं आर्यांची सुधारणा आणि लढाऊ सामर्थ्य हीं कुचकामाचीं होत.......मुसलमानांच्या स्वाऱ्यांमुळे निदान इतकें तरी चांगलें झालें की, हिंदी लोकांमध्ये लढवय्ये लोकांची चांगली भर पडली......... ब्रिटिश अमदानींत थंड हवेमधील गोऱ्या शिपायांची बहुमोलाची भर हिंदी सैन्यांत पडत आहे. तसेंच ब्रिटिश आरमाराच्या सहाय्याने परकीय हल्ल्यापासून आपल्या किनाऱ्याचें रक्षण करण्याचें सामथ्र्य आता हिंदुस्थानला आलें आहे. अशा प्रकारची प्रौढी आजतागायत कोणत्याही काळीं हिंदुस्थानास सांगतां आली नसती .........”

वरील मजकुरावरून विद्यार्थ्यांच्या मनावर कशा प्रकारचा ठसा उमटेल बरें? अर्थात आपण हिंदु लोक दुर्बळच आहोंत आणि त्यामुळे आमच्या रक्षणाला निरंतर दुसऱ्या कोणाची तरी आवश्यकता आहे ! पर्यायाने स्पष्टच बोलावयाचें म्हणजे 'हिंदु जाति' यावचंद्रदिवाकरौ परतन्त्र राहण्यालाच पात्र आहे! असो. ब्रिटिश आरमाराच्या सहाय्याने आपल्या किना-याचें रक्षण करणें, ही गोष्ट हिंदुस्थानसारख्या प्रचंड राष्ट्राला आणि येथील विद्यमान राज्ययंत्राला मोठीशी भूषणावह नाही, असें समतोल विचाराचा कोणी त्रयस्थदेखील मान्य करील; मग त्यांत प्रौढी ती कसली मारावयाची ? तसेंच मुसलमान लढवय्यांची भर पडल्यानन्तर तरी दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेला या देशावर वायव्येकडील लोकांनी केलेल्या स्वा-यांचा बंदोबस्त योग्य प्रकारें करतां आला काय ? देशाच्या अवाढव्य किना-याचें संरक्षण स्वतःच्या हिंमतीवर करण्याची सावधगिरी व राजकीय कर्तृत्व बहामनी सुलतानांनी, विजापूरच्या आदिलशहांनी किंवा जगाचे बादशहा म्हणवूं पाहणाच्या मोंगल बादशहांनी दाखविलें आहे काय? ह्या

 *