पान:हिंन्दू सम्राट्.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( २ )

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्ः


 सर्व सुधारलेल्या देशांतून प्रतापी पूर्वजांचा उज्ज्वल इतिहास योग्य रीतीने लिहून, भावी पिढीसमोर त्याचा आदर्श ठेविला जातो; परन्तु आमच्या देशाची गोष्टच न्यारी आहे! कित्येक परकीय आणि स्वकीय इतिहासकारही कळत किंवा नकळत आमचा इतिहास अशा रीतीने आम्हांपुढे मांडीत आले आहेत की, त्यावरून होणा-या अर्धवट आणि विपर्यस्त ज्ञानापेक्षा पूर्ण अज्ञानहि हितकारी होईल. असल्या इतिहास-ज्ञानावरून निघणारीं प्रमेयें आणि अनुमानें म्हणजे आर्थाचा अनर्थ होय! कोणी म्हणतो, हिंदूंना आर्थात् बहुसंख्य हिंदी लोकांना (Nationality) 'राष्ट्रीयत्व' ही चीज माहीतच नाही! इंग्रजी शिक्षणाने आणि युरोप-अमेरिकेच्या वाढत्या दळणवळणाने अलीकडे आपल्या देशांत 'देशाभिमाना'चें पीक नव्यानेच येऊं लागलें आहे! तर दुसरा कोणी सांगू लागतो, हिंदूंचीं राज्यें म्हणजे 'राजा करील ती पूर्वदिशा' ह्याच तत्वाने चालणारीं; प्रजा म्हणजे जणू मुकीं जनावरें! अशा प्रकारें पाहिजे ते आक्षेप हिंदुस्थान देशाबद्दल आणि हिंदु जातीबद्दल घेतले जात आहेत. याचें कारण मुख्यतः आमच्या इतिहास-लेखनांतील सदोषता हेंच आहे. पुढील उदाहरणांवरून माझ्या विधानाची सत्यता कळून येईल-  हिंदी विद्याथ्यांपुढे त्यांच्या देशासंबंधी चार सोप्या व ख-या गोष्टी हा शब्दप्रयोग पुष्कळांना अप्रिय व तिरस्करणीय वाटण्याचा संभव आहे. क्रेित्येकांना 'भाकरी’च्या प्रश्नापुढे 'धर्म-जात-संस्कृति' ही अवास्तव कटकट वाटण्यासारखी आहे. परन्तु माझ्या मतें 'भाकरी’चा प्रश्नही धर्मरक्षणाच्या अंगभूत आहे. समाजाचें धारणपोषण हा धर्माचाहि उद्देश आहेच. तसेंच 'सम्राट् शब्द पाहूनही नाक मुरडण्याचें कारण नाही. जपान व इंग्लंडमध्ये अद्याप सम्राट् आहेत. प्रजातन्त्रपद्धति वाखाणीत असतां त्यांतही 'सर्वाधिकारी' निर्माण होत आहेत! त्यांच्या राज्यपद्धतीशीं तुलना केली, तर 'हिंदु सम्राटां’नी प्रजेला मतस्वातन्त्र्य अधिक दिलें होतें.