पान:हिंन्दू सम्राट्.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उफेोद्घात.

 “हिंदुस्थानचे हिंदु सम्राट् हा शब्दप्रयोग कोणाला सकृद्दर्शनीं कांहीसा चमत्कारिक वाटला, तर नवल नाही; कारण सध्या ह्या देशावर इंग्रज बादशहांचें 'यूनियन जॅक' फडकत आहे आणि इंग्रजांच्या पूर्वी अनेक शतकें मुसलमान बादशहांचा 'चांद' मिरवत होता! अर्थीत हिंदु सम्राटांच्या अस्तित्वाला आणि कर्तृत्वाला वाव तरी कसा मिळणार? असा प्रश्न उत्पन्न होणें साहजिक आहे; परन्तु हिंदुस्थान देशाच्या इतिहासाचें योग्य परिशीलन केलें, तर आपणांस समजून येईल की, मुसलमानी अमदानीपूर्वी अनेक प्रतापी हिंदु सम्राटांनी पिढ्यानुपिढ्या सार्वभौमत्व आणि अतुल वैभव उपभोगिलें आहे! इतकेंच नव्हे तर इस्लामी सद्दीचा जोर असतांहि किल्येक हिंदु विरांनी स्वतन्त्र राज्यें आणि साम्राज्यें उभारलीं व चालविलीं आहेत. त्यांचें कर्तृत्व हीच देशांतील जागृतीची आणि पुनरुत्थानाच्या पात्रतेची खूण होय! म्हणून अशा कांही घडामोडींचा इतिहास ज्यांच्या आयुष्यांत वडून ओाला आहे, अशा प्रकारच्या कांही प्रसिद्ध *'हिंदु सम्राटांचीं उदबोधक चरित्रे' मी ह्या पुस्तकांत सारांशरूपाने देण्याचें योजिलें आहे.

वीसाव्या शतकांतील लोकशाहीच्या ह्या नवयुगांत‘हिंदु सम्राट्'

                                            ( टीप पृ० २ वर चालू )