पान:हिंन्दू सम्राट्.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)

 इंग्लंड-अमेरिकेतील परतंत्र भावाचा सम्बन्ध आणि इंग्लंड-हिंदुस्थानचा सम्बन्ध हे दोन्ही जाति-संस्कृतिभिन्नता लक्ष्यात घेतली, तर एकाच मापाने मोजता येतील काय?

 (पृष्ठ ८६) शिवाजीने देशाची भावना मराठ्यांत उत्पन्न केली, असे विधान आहे; पण शिवाजीची भावना आधुनिक देशवाचक patriotic असूं शकणार नाही. (पृष्ठ ८०) १६४६ इ० शिवाजीच्या कार्याचा आरम्भ, हा खरा नसून तो शके १५६२ (१६४० इ०) मध्ये झाला होता.

प्रा० दत्तो वामन पोतदार, पुणे.


 [सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक श्री. प्रा. दत्तो वामन पोतदार यांनी भापला अभिप्राय (मतभेद) विस्तृत पत्र पाठवून कळविला. तो सारांशरूपाने छापला आहे.   -लेखक]