पान:हिंन्दू सम्राट्.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५)



(३)

 'हिंदुस्थानचे हिंदु सम्राट् ' या छोट्या चरित्रमालेची पूर्वमुद्रित प्रत पोचली. त्या बाबतींत माझा मतविसंवाद कळविणे अवश्य कर्तव्य वाटते. (उपोद्घात ) पान २ मध्ये ' राष्ट्रियत्व व देशाभिमान' आमच्यामध्ये होता, असे म्हणण्याचा एकंदर रोख दिसतो; पण आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये राष्ट्रीयत्व ( Nationalism) व देशाभिमान ( Patriotism) ह्या अर्थाने कितीसा मजकूर आढळतो? दुसरे असे की, त्या कल्पनाच सर्वोत्तम, असे आहे काय ? त्या कल्पनांचे युरोपीय अवतार जगाच्या अधोगतीसच कारणीभूत झाले आहेत! त्या जशाच्या तशा घेणे आम्हांस जरूर नसून, आमचेच तत्त्वज्ञान साफसूफ करून वाढविले पाहिजे. आमची विश्वबंधुत्वाचीच कल्पना सरस आहे. कमी एवढेच की, आम्ही भौतिक शास्त्र-ज्ञान कांहीच वाढविले नाही.

 पुढे पान ३-४ वर नजर देतो. काही प्रश्न करून लिहिले आहे की, ह्यांची उत्तरे देतील, तर प्रतापी हिंदु वीरच ! हिंदु वीर प्रतापी होते, यांत शंका नाही; परन्तु भोवतालच्या जगाच्या मानाने विचार केला, तर कोणीही सत्यदृष्टि इतिहासलेखक त्यांची कीवच करील ! रणजितसिंह-बाजीराव ह्यांची समकालीन युरोपियनांशी तुलना केली असता, त्यांमध्ये मोठी तफावत दिसून येईल. समोर काय चालले आहे, याचेही ज्यांना आकलन करता आले नाही, त्यांचा बडेजाव गाण्यांत अर्थ नाही. आमचे मोठेपण खरोखर कशांत होते, ते ओळखले पाहिजे.

 पुढे पान ५-६ पाहूं. पारतन्त्र्य आणि अपकर्ष ह्या बाबतीत अमेरिका-इटाली वगैरे देशांशी हिंदुस्थानची तुलना केली आहे; पण ते देश आकार, लोकसंख्या इत्यादि बाबतींत कमी असल्यामुळे हिंदुस्थानसारख्या प्रचंड, सुसंपन्न व सुसंस्कृत देशाची त्यांच्याशी तुलना होणार नाही. तसेंच