पान:हिंन्दू सम्राट्.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१००)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

पाहिजेत, हें खरें; परन्तु अनेक संकटांशीं झगडत आम्ही टिकून राहिलों आहोत, त्या अर्थी आपणांमध्ये कांही गुणहि असावेत, हे उघड आहे. ते गुण वृद्धिंगत करून दोष घालविणे हे आपले काम आहे. राजकीय पराभवा- नंतरही आपली संस्कृति टिकविण्याचा उद्योग आमचा चालूच आहे. परकी संस्कृति आम्ही आपली अशी कधीच मानली नाही, हेच आमच्या राष्ट्रीय इतिहासाचें रहस्य होय. परिस्थितीप्रमाणे मार्ग बदलतील; पण संस्कृति व राष्ट्रीयत्व रक्षण करण्याचा आमचा प्रयत्न निरंतर चालू राहील, अर्से म्हणण्याला हरकत नाही. शेवटी ' रामदास ' स्वामींचा आशीर्वाद' लिहून हे पुस्तक संपवितों.

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार |
झाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥ १ ॥