पान:हिंन्दू सम्राट्.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपसंहार.

(९९)


४. निवृत्तिपर तत्त्वज्ञान.

 'ऐहिक प्रगतीबद्दल उदासीनतेचें हिंदू तत्त्वज्ञान देशाला घातुक झालें. ' हा आक्षेपही अत्युक्तिपूर्ण आहे. वर्णाश्रमरचना जर लक्षांत घेतली तर हा आक्षेप फोल ठरतो. चार वर्णांमध्ये फक्त ब्राह्मणच निरिच्छ असावे, अशी योजना आहे. बाकी तीन्ही वर्णांना 'उदासीन रहा' असें आमचें तत्वज्ञान सांगत नाही. व्यक्तिशः पाहिलें तरी पहिले दोन आश्रम ऐहिक उन्नतीला ठेविले आहेतच. वैदिक मंत्रांतील अनेक प्रार्थना व्यक्तीला व राष्ट्राला 'अभ्युदय' प्राप्त व्हावा, अशा अर्थाच्या आहेत ! ' हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्य से महीम् ॥ ' ह्या भगवद्गीतेच्या उपदेशाप्रमाणे लाखो रजपूत व मराठे स्वराज्यासाठी लढले आहेत, पिढ्यानुपिढ्या स्वदेश व स्वधर्मासाठी लढलेले वीर शेवटीं हरले, तरीही त्यांचें नांव इतिहासांत अजरामर राहील ! निवृत्तिपर तत्वज्ञानाचे कट्टे पुरस्कर्ते तुकारामबुवा देखील शिवाजीला आपल्याबरोबर भजन करीत बसण्याला सांगत नव्हते ! मग रामदासांच्या तेजस्वी उपदेशाबद्दल बोलावयासच नको !

 सारांश, इतर देशांप्रमाणेच आमच्या देशांत व हिंदु समाजांत देखील अनेक राजे, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ते व ग्रंथकार होऊन गेले आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या उज्ज्वल इतिहासामुळे आपली भूतकालीन सुस्थिति समजते, वर्तमानकाळीं आत्मविश्वास वाहूं लागतो आणि त्यानंतर भविष्य काळाविषयी आशेचे विचारही उत्पन्न होतात. आता आपल्या देश- बांधवांमध्ये दोष नाहीतच, केवळ यहच्छेने आमची भवनति झाली आहे, असें मी म्हणत नाही. परन्तु आम्हां हिंदूंच्या दोषांचें वर्णन सर्वत्र इतकें झाले आहे की, त्यामुळे आमचा आत्मविश्वास व स्वाभिमान नष्ट होऊन एक प्रकारें न्यूनगंड उत्पन्न होण्याचा संभव वाटतो! ज्या अर्थी जगांत आज आम्ही मागे पडलों आहों, त्या अर्थी आमच्यांत कांही दोष असले