पान:हिंन्दू सम्राट्.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९८)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

प्रांतांत कशी आहे, तें पाहूं-

 मलबारमधील श्रीशंकराचार्य वैदिक धर्मरक्षणार्थ उत्तरेला बदरीनाथपर्यंत हिंडले. काशींतील गागाभट्ट हिंदु राजाचें पाठबळ मिळून धर्मरक्षण व्हावें म्हणून शिवाजीच्या राज्याभिषेकाला हजर राहिला. उदेपूरचा महाराणा ‘लाखाजी ' गया क्षेत्राच्या रक्षणासाठी वृद्धापकाळ धावून गेला. मराठी साम्राज्याचे आधार असे प्रधान आणि सरदार 'काशी' घेण्यासाठी तळ- मळत होते. निजाम, टिपु सुलतान ह्यांचे राज्यांतील अनेक हिंदु संकटकाळ आपुलकीने पेशव्यांकडे साह्याची प्रार्थना करीत ह्या ऐक्याविषयी झेडरिक व्हाईट' हा ' दि फ्यूचर ऑफ ईस्ट अँड वेस्ट ' ग्रंथांत लिहितो -

 “हिंदुस्थानांतील अनेक प्रांत, अनेक जाती व पंथ, अनेक भाषा अशा कारणांमुळे परस्परभिन्नता वाटते. परन्तु त्या सर्व विविधतेमध्ये एक विलक्षण प्रेमसूत्र आहे. तें राजकीय दृष्ट्या इतिहासामध्ये फारसें प्रगट झालेले नाही. परन्तु तें इतकें बळकट व प्रभावशाली आहे की, तें सर्व देशाला एकत्र राखूं शकते. त्याने अन्तर्गत विरोधांचा व बाहेरील आक्र- मणांचा अनेक वार यशस्वी प्रतिकार केला आहे ! "

३. एकमुखी राजसत्ता.

 हिंदुस्थानच्या लोकांना एकतंत्री राज्यव्यवस्था आवडते. 'ना विष्णुः पृथिवीपतिः' म्हणजे राजा हा ईश्वरी अंश आहे, अशी भावना बाळगणाऱ्या भोळ्या हिंदूंना युरोपियन लोकांच्या सहवासाने आता लोकसत्तेची नवी दृष्टि प्राप्त होऊं लागली आहे, इत्यादि विधानें देखील गैरसमजाचीं आहेत. आमच्या देशांत 'पार्लेमेंट' नसले, तरी इतर अनेक लोकसंस्था होत्याच, ग्रामपंचायतीच्या रूपाने हिंदुस्थानांत 'स्थानिक स्वराज्य चालू होतें, 'राजा प्रकृतिरंजनात् ' ह्याप्रमाणे वागणारा राजा ' ईश्वराचा अंश' मानण्यांत अयोग्य काय ?