पान:हिंन्दू सम्राट्.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९६)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

चतुःसीमा, ज्याला द्यावयाचे त्याचें नांव व कामगिरी आणि दिल्याची तारीख एवढीच माहिती त्या वेळीं देत नसत; त्यामुळे पुष्कळ ऐतिहासिक माहिती मिळूं शकते. देवगिरीचा प्रधान 'हेमाडपंत' ह्याने लिहिलेल्या धार्मिक ग्रंथांतून'यादव' राजघराण्याचा बराच • इतिहास आला आहे.

 'कल्हण ' नांवाच्या गृहस्थाने 'राजतरंगिणी' म्हणून काश्मीर देशाचा इतिहास लिहिण्याला इ० स० ११४८ मध्ये सुरवात केली व तो पुढेही जोनराज, श्रीवरपंडित, व प्राज्यभट्ट ह्या गृहस्थांनी क्रमाक्रमाने लिहून सोळाव्या शतकांत पूर्ण झाला ! सतत चारशे वर्षे निरनिराळ्या लोकांनी आस्थापूर्वक प्रयत्न करून आपल्या प्रांताचा इतिहास लिहिणें ही गोष्ट कौतुकास्पद तर आहेच; शिवाय त्यामधील चिकाटी व सहकार्य हे गुण अनुकरणीय आहेत. बिल्हण कवीचें ' विक्रमांकदेव चरित्र, बाणभट्टाच 'हर्षचरित्र, 'चंदकवीचा 'पृथ्वीराजरासा, ' हंभीर महाकाव्य, खोम्माण- रासा, ' पृथ्वीराजविजय, ' ' कीर्तिस्तंभप्रशस्ति, आल्हाखंड' इत्यादि ग्रंथांवरून पंजाब, काश्मीर, राजस्थान, बुंदेलखंड वगैरे प्रांतांचा बराच इतिहास मिळतो.

 रजपूत लोकांत वंशावळी व ख्याति लिहून ठेवण्याचा फार प्रघात असे. बिकानेर व जोधपूर राज्यांत असे विस्तृत 'ख्याति - इतिहास ' लिहिलेले आढळतात. जोधपूरच्या जसवंतसिंह राजाचा दिवाण 'मुहिणोत नैणसी ' हा शूर, मुत्सद्दी व इतिहासाचा अभ्यास होता. तो दिवाण असल्यामुळे मोठमोठ्या रजपूत व मुसलमान सरदारांशीं त्याचा विशेष परिचय असे. त्यांजकडून व भाट - चारण अशा दरबारी लोकांकडून व ठिकठिकाणच्या जुन्या ख्याति, लेख इत्यादि अनेक साधनांवरून त्याने आपला एक बृहत् - संग्रह तयार केला. त्यावरून १५-१६ व १७ व्या शतकांतील राजस्थानचा चांगला इतिहास समजतो. म्हणून पं० गौरीशंकर ओझा ह्यांनी 'मुहिणोत