पान:हिंन्दू सम्राट्.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपसंहार.

(९५)

त्यांच्या डायन्या आणि एका स्वतंत्र पद्धतीने लिहिलेले इतिहास पहावयास मिळतात. तसा हिंदूंमध्ये प्रघात नाही. x ह्या आक्षेपांत सत्यांश फार थोडा आहे. हिंदूंच्या सामान्य प्रवृत्ति भौतिकापेक्षा आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या विशेष असतात. अयोध्यापति श्रीरामचन्द्र केवळ खन्दा लढवय्या किंवा मोठा चक्रवर्ती राजा म्हणून हिंदूंना पूज्य वाटत नसून वर्णाश्रमधर्म चांगल्या प्रकारें स्वतः आचरणारा आदर्श पुरुष म्हणून आदरणीय वाटतो.

 रामायण व महाभारत तसेच निरनिराळीं पुराणें हीं वस्तुतः इतिहासच होत. मात्र त्यांजवर धार्मिक पावित्र्याचें व परंपरागत श्रद्धेचें आवरण आहे.. कालाच्या प्राचीनत्वामुळे आणि ग्रंथकारांच्या वर्णनशैलीमुळे त्यांमधून क्वचित् अतिशयोक्ति किंवा असंबद्धताही असूं शकेल. आजच्या एखाद्या समारंभाचें किंवा चळवळीचे वर्णन जर निरनिराळ्या नियतकालिकांतून पाहिले तर त्यांतही बरेंच अन्तर आढळतें ! पण तेवढ्यावरून ती चळवळ किंवा समारंभ सर्वस्वी कल्पित किंवा असत्य मानण्याचें कारण नाही. उपरिनिर्दिष्ट आमच्या प्राचीन ग्रंथांवरून केवळ राजेलोकांची नामावली किंवा सनावळीच न समजतां त्या काळांतील समाजस्थिति आणि नीतिदेखील उत्कृष्टपणे कळून येते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्येही पुराण, इतिवृत्त, धर्मशास्त्र 'इतिहास' विषयाचा उल्लेख असून अर्थशास्त्र, आख्यायिका आणि उदाहरण ' असे त्याचे सहा भाग सांगितले आहेत. राष्ट्रकूटांसारख्या राजांनी दिलेल्या सनदांमधून ( दानपत्रे ) विद्य- मान दानकर्त्या राजपुरुषांबरोबर त्याच्या कांही पूर्वजांचा पराक्रमही थोडा- बहुत वर्णिलेला असतो. हल्लीप्रमाणे इनाम द्यावयाच्या मिळकतीच्या


x पर्यायाने लिहून ठेवण्यासारखें हिंदू लोकांनी कांही कर्तृत्व दाखविलेंच नाही.