पान:हिंन्दू सम्राट्.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९४)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्म्राट्

भूगोल व सद्यःस्थिति कळण्यास मदत होई.

 ह्या गेल्या दोन हजार वर्षांत बौद्ध-काल थोडासा वजा केला तर वर्णाश्रमधर्माचे आचरण बरँच कडक स्वरूपांत होतें, असें दिसेल. तरी त्या कर्मठपणाला आळा घालून साधुसंत साध्या प्रेमळ भक्तीचा व समतेचा उपदेश सर्वांस करीत.

 अन्यधर्मीय लोकांश वागतांना सहिष्णुता हा तर हिंदूंचा मुख्य गुण होय. बौद्ध - जैनांशीं झालेले शांत संग्राम अर्थात् पंडितांचे बुद्धिवाद आपण मागील अनेक प्रकरणांमध्ये पाहिले आहेतच. मुसलमान व ख्रिस्ती ह्यांचाही कोणी हिंदु राजाने सहसा छळ केला नाही. राणा प्रताप, शिवाजी, चिमाजी अप्पा ह्यांच्या तावडींत सापडलेल्या मुसलमान व ख्रिस्ती शत्रूच्या स्त्रियांवर त्यांनी पापी नजर ठेविली नाही. मशिदी फोडणे किंवा थडग्यांचा विध्वंस व विटंबना असली कामेंही हिंदु राजांनी केली नाहीत. अपवाद म्हणून तापट शीखांचा एखादा सांगतां येईल, पण तोही सूडाध्या भावनेमुळे असेल ! असो. गुजराथच्या हिंदु राजाने मुसलमानी आक्र.. मणामुळे त्रस्त होऊन असहाय झालेल्या 'पार्शी लोकांना उदार बुद्धीने आपल्या राज्यांत राहू दिले. याच लोकांतील राष्ट्रपुरुष दादाभाई नौरोजी ह्यांनी आमरण खच्या कळकळीने हिंद देशाची सेवा केली आहे.

 हिंदु समाज आणि हिंदुस्थान देश ह्यांजवर परकीय इतिहासलेखकां-- कडून 'राईचा पर्वत' करून लादलेले कांही आक्षेप व दोष ह्यांविषयीं आता थोडा विचार केला असतां अप्रस्तुत होणार नाही; कारण अशा निंदकांमध्ये कांही स्वकीय लोकही असतात !

१. इतिहास-लेखन.

 सर्वांत मोठा आक्षेप म्हटला म्हणजे मुसलमानांच्या तवारिखा किंवा