पान:हिंन्दू सम्राट्.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपसंहार.

(९३)

५. धार्मिक समजुती.

 हिंदु समाजावर 'देव' आणि 'धर्म' ह्यांची विलक्षण छाप असते, किंबहुना त्यांतच आमच्या सामाजिक व वैयक्तिक जीवनाचा अन्तर्भाव होत असतो. प्राचीन यज्ञसंस्थेशीं आमचें जीवन कसें निगडित झाले होतें, हें मागील चौथ्या प्रकरणांत दाखविलेंच आहे. ‘देवालय' ही संस्थाही अशीच अनेक काम हितप्रद होणारी आहे व आजपर्यंत झालेली आहे.आजचे नवमतवादी लोक कांही म्हणोत, परन्तु खेड्यांतील बहुजन- समाजाला ती धार्मिक समजूत उपयुक्त आहे यांत शंका नाही.

 १. देवालय ही हिंदूंची 'शाळा' होती. केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या स्त्रीपुरुषांनाही कीर्तन - भजनाचे द्वारा नीति, कर्तव्य पाठ देणारी ती नमुनेदार पाठशाळा होती !

 २. देवालय हे न्यायालय होतें. देवावरील श्रद्धामिश्रित भीतीमुळे सहसा असत्य भाषण ल्याजागी कोणी करीत नसे. गांवांतील चार समंजस लोकांच्या वजनाने अल्प खर्चात न्यायदान होत असे.

 ३. देवालय, त्याभोवतालच्या धर्मशाळा, तळीं इत्यादि बांधकामें नवीन करणे किंवा जुनीं दुरुस्त करणे, ह्या कामीं गांवांतील अगर प्रांतांतील कारागिरीला उत्तेजन मिळे. हिंदूंच्या शिल्पकलेचे नमुने व स्मारकें म्हणजे मंदिरेंच होत !

 ४ देवाची स्तुति किंवा उपासना ह्यामध्ये गायन, वादन आणि नृत्य- कला ह्यांना उत्तेजन मिळत होतें.

 ५. देवालय हें टाऊतूहॉल- सभागृह होतें. त्याचे भोवतालच्या ओवन्या म्हणजे अतिथींना निवाज्याच्या जागा असंत, देवाचे उत्सव व जना म्हणजे एक प्रकारचीं प्रदर्शन होऊं शकत. तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याने देशाचा