पान:हिंन्दू सम्राट्.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपसंहार

(९१)


ग्रन्थ चीनमध्ये गेल्याचें बौद्ध प्रवासी लोकांच्या वर्णनांवरून दिसत आहे. ह्यावरून ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार ह्या बाबतींत हिंदु विद्वान् किती उत्सुक होते, हैं ध्यानांत येईल. कविश्रेष्ठ कालिदास ह्याच्या ' शाकुंतल ' नाटकाने तर गटे नामक जर्मन पंडिताला जणू वेडच लावलें ! अशा अनेक ग्रंथांची कित्येक भाषांतून भाषांतरेंही झालीं आहेत.

 'आर्यभट्ट' ह्या ज्योतिष्याने पृथ्वी आपल्या आंसाभोवती फिरते, हें प्रथम शोधून काढले. ग्रहण लागण्याची कारणे त्याच्या ग्रंथांत सापड- तात. वराहमिहिर ह्याची बृहत्संहिता म्हणजे प्राचीन ज्ञानकोशच होय. व भास्कराचार्य, कोशकर्ता कादंबरीकार बाणभट्ट, गणिती ब्रह्मगुप्त अमरसिंह व हेमचन्द्र ( जैन ) इत्यादि अनेक शास्त्रांतील विद्वान् नामांकित होऊन गेले. धार्मिक वाङ्याय हे तर हिंदूंच्या साहित्याचें एक स्वतंत्र आणि फार मोठं दालन आहे. त्यामध्ये हिंदु-बौद्ध - जैन अशा सर्व विद्वानांनी अनेक देशभाषांतून विपुल वाङ्मय लिहून ठेवले आहे.

४. शिल्पकला.

 भव्य आणि सुन्दर मंदिरें, प्रासाद, कीर्तिस्तंभ आणि मूर्ति इत्यादि गोष्टींवरून देशांतील कलाकौशल्य आणि संपन्नता अजमावतां येते. हिंदु- बौद्ध शिल्पकलेच्या कामांमध्ये 'अजिंठा' येथील लेणीं विशेष प्राचीन व प्रसिद्ध आहेत. मि० ग्रिफिथ नामक एक तज्ज्ञ १८७३ सालच्या रिपोर्टा- मध्ये म्हणतो- 'क्लॉरेन्टाईन कला उत्तम चित्र रेखाटील, व्हेनेशियन् कला छानदार रंगकाम करील, परन्तु अजिंठ्यामधील चित्रांतून आढळणारें आविर्भावदर्शन मात्र कोणालाच साधाणार नाही ! "

 सम्राट् अशोकाचे वेळीं ही वास्तुविद्या व चित्रणकला ह्यांची चांगलीच प्रगति झाली होती. त्या वेळच्या गुंफांमधील आंतला भाग पॉलिश करून इतका गुळगुळीत व चमकदार बनविला होता की, तो दगडी नसून