पान:हिंन्दू सम्राट्.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९०)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

स्त्रियांचीं चरित्रेंही वाचनीय व स्फूर्तिप्रद आहेत; परन्तु विस्तारभयास्तव त्यांच्या नामनिर्देशावरच मी भागवून घेत आहें.

आता लोकस्थिति पहावयाची ती शेती, व्यापार-धंदे, शिक्षण, शिल्प- कला व धार्मिक समजुती अशा विषयांची पृथक् पृथक् चर्चा करून पाहणें योग्य होईल.

१. शेती.

 जमीन सुपीक आणि अनेक प्रकारचें हवापाणी आपल्या देशांत असल्या- मुळे निरनिराळीं धान्यें, कापूस व इतर कच्चा माल विपुल पैदा होत असे. अनेक हिंदुराजांनी पाटबंधारे करून शेतीला उत्तेजन दिले होतें, मैग्यास्थिनीज् म्हणतो- 'ऊस आणि कापूस ह्या पिकांचें दर्शन आम्हां ग्रीकांना प्रथम हिंदुस्थानांतच झाले ! ' निर्वाहाचे पदार्थ अत्यन्त स्वस्त असल्यामुळे लोक सुखी असत.

२. व्यापार-धंदे.

 हा देश कृषिप्रधान होता; तरी केवळ शेतकज्यांचा अडाण्यांचा नव्हता. दशेतकरी दुसरेही व्यवसाय करीत. येथील रेशमी व जरीचें कापड व इतर विविध कलाकुसरीचे जिन्नस परदेशी जात. हिंदु व्यापान्यांचा वाहतुकीचा धंदाही कित्येक शतकें स्वावलंबी होता. त्यामुळे इतर देशांतून भारता- मध्ये संपत्तीचा ओघ वहात असे.

३. विद्या व विद्वान्.

 नालंद, तक्षशिला, उज्जयिनी, काशी, प्रयाग, कांचीवरम् इत्यादि ठिकाणीं मोठमोठीं विद्यालयें होतीं, बौद्धांचे विहार व हिंदूंचीं देवळें ह्यांमधूनही विद्यादान होत असे. छापण्याची कला नसतांही अनेक विद्वान् व विद्यार्थी काळजीपूर्वक हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करीत. असे अनेक