पान:हिंन्दू सम्राट्.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिन्दुस्थानचे हिंदु सम्राट्ट.

(८९)

उपसंहार,


 पूर्वसंकल्पाप्रमाणे येथवर दहा हिंदु सम्राटांचीं चरित्रे वर्णन करून आणि मधूनमधून देशामध्ये झालेल्या धार्मिक व साहित्यिक घटनांची थोडथोडी माहिती देऊन प्रस्तुत पुस्तकाचें काम पूर्ण होत आले आहे. उद्देशाप्रमाणे तें कार्य कितपत साधले आहे, हे ठरविण्याचे काम मी सूज्ञ वाचकांवरच सोपवितों, ह्यानन्तर गतकालाकडे थोडी नजर देऊन, तत्कालीन सामान्य लोकस्थिति कशी होती ? आपली अवनति कां झाली ? आपणांवरील बहुतेक आक्षेप कसे विपर्यस्त व अतिशयोक्तिपूर्ण आहेत ? याचा विचार करून आपल्या इतिहासाचें रहस्य समजून घेतले पाहिजे.

 ह्या पुस्तकांत वर्णिलेल्या दहा सम्राटांइतकेच प्रतापी असे चालुक्य- वंशांतील दुसरा पुलकेशी, गुजराथेंतील सिद्धराज, धारचा भोज राजा, महाराजा रणजितसिंह असे अनेक राजे हिंदुस्थानांत होऊन गेले आहेत. महाराष्ट्रांतही शिवाजीनंतरदेखील अनेक हिंदुस्त्रीपुरुषांनी आपलें तेज अनेक वेळा प्रकउ केले आहे. त्यांपैकी चिमाजीअप्पाने गोन्या पोर्तुगीजां- वर मिळविलेला वसई येथील विजय आणि महादजी शिंद्याने वडगांव येथे घेतलेला इंग्रजांचा खरपूस समाचार, हे विशेष नाविन्यपूर्ण व स्मर णीय आहेत. इंग्रजांची जगप्रसिद्ध मुत्सद्देगिरीसुद्धा नाना फडणीस व महादजी शिंदे ह्या जोडीपुढे फिकी पडली होती !

 तसेंच स्त्रीजातीला भूषण अशा- चौरागडची राणी दुर्गावती, चितोडची. पद्मिनी, इंदूरची अहिल्याबाई, झांशीची लक्ष्मीबाई इत्यादि अनेक