पान:हिंन्दू सम्राट्.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)

झरकार, शिकलगार, पखाली, नकरची. सटाण्याचे मुसलमान आपल्या मुलांना शेंडी ठेवतात, महाबळेश्वरचे धावड खंडोबा व म्हसोबाचे टाक यांची पूजा करतात. हे सर्व सांगण्याचे कारण एवढेच की, खरोखर मुसलमान हे कोणी या देशांत परके नाहीत. आज अराष्ट्रीय वृत्ति सोडल्यास, धर्माने मुसलमान किंवा ख्रिश्चन राहून हिंदी राष्ट्राच्या उद्धारार्थ खटपट करणे काही कठीण नाही. असें ऐक्य साधावें ही राष्ट्रीय सभेची खटपट आहे; पण यासाठी राष्ट्रीय सभेचे कुलगुरु महात्माजी, बॅ० जिना यांच्याकडे जों जो धाव घेत आहेत, तो तो त्यांच्याकडून ऐक्यासाठी पुढे केलेला हात झिडकारला जात आहे व एकसंधी हिंदी राष्ट्राचे तुकडे करण्याचे घातक राजकारण खेळविले जात आहे. अशा वेळी आसेतुहिमाचल पराक्रम करणाऱ्या हिंदु सम्राटांना आवाहन करून हिंदूंची राष्ट्ररक्षणाची बुद्धि जागृत केली, तर चुकले कोठे ? समाजांत उत्पन्न होणारे वाड्मय हे कळत नकळत परिस्थितीचा पडसाद घेऊन उठत असते.

 यावर समाजवादी व राष्ट्रविचारवादी म्हणतील, 'धर्म ही दिवसेदिवस राजकारणांत दुय्यम स्थान प्राप्त होत जाणारी बाब आहे. राष्ट्रीय भावनेस स्वयंभू असें स्थान युरोपांत निर्माण झाले आहे, तसे हिंदुस्थानांतही होईल किंवा आर्थिक हितसम्बन्ध हे धर्मेक्य किंवा वंशैक्य यावर अधिष्ठित झालेल्या भावनांना छेदून नवे वर्ग निर्माण करतील. जागतिक राजकारणाचा हा प्रवाह लक्ष्यात घेऊन हिंदु वा इस्लाम या धर्मभावनांना राष्ट्रीय जागृतीसाठी डिवचणे योग्य नाही. धर्मास दुय्यम स्थान मिळणे, जे क्रमप्राप्त आहे, ते होऊ द्यावे.' यास उत्तर हेच की, समाजवादी किंवा राष्ट्रविचारवादी म्हणतात तितकी ही मतभेदातीत बाब नाही. कम्युनिझमवर अधिष्ठित झालेल्या रशियाने हिटलरशी सहकार्य केले आहे. खुद्द हिटलरने वंशशुद्धीच्या भावनेने जर्मनांस डिवचून जागे करण्यांत यश मिळविले आहे. अशा स्थितीत हिंदुसंस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदी राष्ट्रास डिवचून जागें