पान:हिंन्दू सम्राट्.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपति शिवाजी महाराज.

(८७)

घेऊन मराठ्यांना जय मिळवून दिला! प्रत्यक्ष झछत्रपति शिवाजी आप्रा येथे कैदेत असतांदी मराठ्यांचे इकडील कार्य पूर्ववत् सुरळीत चालू होतें.

 ( उ ) किनान्याच्या सुरक्षितपणासाठी शिवाजीने आरमार तयार केलें. विजापूरचे अदिलशहांनी तें काम शिद्दीवर सोपविले, तर दिल्लीच्या मोंगलांनी बंगालच्या किनाज्याचे संरक्षण परकी पोर्तुगीजांना सांगितले. हैं परावलंबी धोरण सोडून त्याने आपले राजनीतिन पुण्य सिद्ध केले आहे.
 ( ऊ ) आपल्या सरदारांना जहागिरी न देतां रोख पगार आणि इतर बक्षिसे देऊन त्यांजकडून काम करून घेतले. त्यामुळे त्याचे सरदार डोईजड किंवा शत्रूला फितूरं झाले नाहीत. लुटीचा सर्व ऐवज एकत्र राजाकडे जमा करून नंतर मिळेल तेवढे बक्षीस घ्यावयाचें, अशी कडक शिस्त असल्यामुळे त्याची मुलुखगिरी फायदेशीर होऊन, खजिना भरलेला असे. स्वतः राजा देश व धर्म ह्यांच्या कल्याणासाठी झटत असल्यामुळे त्याचे अधिकारीही स्वामिनिष्ठ, अल्पसंतुष्ट व प्रामाणिक असेच होते.
 (ए) पौर्वात्य राजांचा स्वतन्त्रपणा आणि पाश्चात्यांची लोकसत्ता- पद्धति ह्यांचा सुंदर मिलाफ घालणारी 'अष्टप्रधानसंस्था' निर्माण करून व त्यांजवर अधिकाधिक जबाबदारीचीं कामें टाकून त्यांना तरबेज केलें. त्या व्यवस्थेचा उपयोग संभाजी व राजाराम ह्यांच्या कारकिर्दीत विशेष झाला. शिवाजीचें राज्य 'मराठी राज्य' म्हणून ओळखले जातें, भोसल्यांचें म्हणून नव्हे. तो आपणांस 'देव, गाई आणि ब्राह्मण ह्यांचा प्रतिपालक' म्हणवीत असे, भगीरथ प्रयत्न करून त्याने 'मराठ्यांचें राष्ट्र' बनविले.
 (ऐ ) शिवाजीचें राज्य क्षेत्र विस्ताराने लहानच होते आणि त्याचे सैन्यांत किंवा राजसभेत बादशाही रुबाब नव्हता, तरीही त्याला 'दक्खन- चा सम्राट्' असें म्हणण्याला हरकत नाही. 'अवघी दक्षिण दक्षिणिया हातीं' हे जुन्या बखरींतील वाक्य त्याच्या उद्योगाचें रहस्य दर्शवीत आहे. विजापूर व गोवळकोंडा येथील सुलतान त्याला दरसाल खंडणी पाठवीत होते. मोंगलांच्या ताब्यांतील खानदेश-व-हाडमधून प्रतापराव गुजराने