पान:हिंन्दू सम्राट्.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८८)

हिन्दुस्थानवे हिन्दु सम्राट्

खंडण्या गोळा केल्या आणि गावोगावच्या पाटलांना चौथाई वसूल केल्याबद्दल पावत्याही दिल्या नंतर स्वतः शिवाजीने कर्नाटकांत स्वारी करून बराच प्रदेश घेतला व तेथे आपलीं ठाणीं स्थापन करून आपले अधिकारीही ठेवून दिले. औरंगजेबासारखें दीर्घायुष्य त्याला लाभलें असतें, तर सातव्या शतकांतील चालुक्य सम्राट् दुसरा पुलकेशी ह्याचेप्रमाणे शिवाजी दख्खनचा सम्राट् झाला असता.
 (ओ) त्या धामधुमीच्या काळांत वैभवाची निदर्शक अशीं शिल्पकलेचीं कामें कोठून होणार ? तरीपण त्याने रायगडावर सुंदर वाडे व गंगासागर तलाव वगैरे कामें केलीं. अनेक मजबूत किल्ले ह्रींच त्या वेळच्या शिल्प- कलेचीं स्मारकं होत.
(औ ) त्याने भाषाशुद्धीसाठी राज्यव्यवहारकोश नांवाचा ग्रंथ लिहविला. प्रधानांवीं फारशीं नांवें बदलून संस्कृत पद्धतीचीं ठेविलीं. दरबारचें सर्व लेखन मराठी भाषेत व मोडीमध्ये होऊ लागले. संस्कृत भाषेलाही उत्तेजन दिले.
(अ) स्वधर्मांवर त्याचें प्रेम होते; परंतु मुसलमांनी धर्माला त्याने उपसर्ग दिला नाही. इतर हिंदु साधूंप्रमाणे 'बाबा याकृत' नामक मुसलमान साधूलाही तो पूज्य मानी. लुटींत सापडलेल्या कुरणाचे ग्रंथ किंवा स्त्रिया सन्मानपूर्वक तो परत पाठवी. त्याचे आरमारांत मुसलमानही अधिकारी असत. मदारी मेहतर ह्या मुसलमान फरासाने अग्यास त्याचा जीव वाचविला.
(अः ) शिवाजी लष्करी अधिकान्याला पत्र लिहितो-

 "कोणी कुणब्याकडील दाणे आणील, कोणी गवत आणील. म्हणजे मोंगलांहूनही अधिक तुम्ही, ऐसा त्यांस तळतळाट होईल! रयतेस कार्डाचा आजार द्यावया गरज नाही. खजानांतून वाटण्या पदरीं घातल्या आहेती. कोणावर जुलुम करावयाची गरज नाही."

अशा प्रजावत्सल शिवाजीबद्दल भूषण कवि म्हणतो-

धरामें धरम राख्यो, राख्यो गुन गुनीमें।
देस देस कीरति बखानी तब सुनी मैं ॥