पान:हिंन्दू सम्राट्.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८६)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.


मध्ये शिवाजीने उत्पन्न केली. संबंध राष्ट्राचे भवितव्य एकाच युद्धावर मराठ्यांनी अवलंबून ठेवलें नाही.

 (इ) शत्रूच्या हालचालींची बातमी ठेवण्याची दक्षता, हैं शिवाजीच्या यशाचें एक महत्वाचे कारण होतें. सम्राट् चंद्रगुप्त मौर्य ह्याचेप्रमाणे शिवाजीचें स्वतंत्र बातमीखातें असून त्यामध्ये बहिर्जी नाईक प्रमुख होता. रामदेव यादव देवदर्शन करीत असतां किंवा बंगालचा लक्ष्मणसेन भोजन करीत असतां अकस्मात् मुसलमानांचा हल्ला येऊन त्या हिंदु राजांचे पदरीं जें नामुष्कीचें अपयश आलें, त्याचें कारण गाफीलपणा हेंच होय ! मुसल- मान राज्यकर्त्यांमध्येहि ह्या दक्षतेचा बराच अभाव होता. नाहीतर तैमूर- बाबर - नादिरशहा यांच्याबरोबर हिंदुस्थानच्या बादशहांनी दिलेल्या लढाया पानपत - दिल्लीमध्ये न होतां दूर पेशावर अटकच्या आसपास झाल्या असत्या आणि पंजाबमधील प्रजेची प्राणहानि टळली असती ! त्याच सुस्तपणाचा फायदा बादशाही फौजेवर छापे घालून चपळ मराठे स्वारांनी अनेक वार घेतला. रामदासांचे शिष्य सर्वत्र संचार करीत अस ल्यामुळे त्यांजकडून कांही बातमी शिवाजीला मिळे. विजापूरहून अफझुल- खान येत असल्याची खबर रामदासांनी शिवाजीला कांही सांकेतिक ओग्यांचें पत्र पाठवून कळविली होती. 'प्रतापगडचें' युद्ध ह्या पुस्तकांत त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

 (ई) आपला राजा किंवा सेनापति युद्धामध्ये मरण पावला की, विना- कारण तेवढ्यावरून घाबरून जाऊन हिंदूंनी रणांगण सोडून पळ काढल्या- चीं अनेक उदाहरणें अढळतात, ह्या चुकीची सुधारणा करून एकाचे जाग दुसरा पुढारी उभा करून त्याचे नेतृत्वाखाली देशासाठी आपण लढलेंच पाहिजे, अशी भावना शिवाजीने मराठ्यांत उत्पन्न केली. सिंहगडावर तानाजी पडतांच त्याची जागा सूर्याजीने घेऊन युद्ध जिंकलें, तसेंच जेसूरी- च्या लढाईत प्रतापराव गुजर पडतांच त्याची जागा हंसाजी मोहित्याने