पान:हिंन्दू सम्राट्.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपति शिवाजी महाराज.

(८५)


अफझलखानाचा वकील कृष्णाजीपंत ह्याला मोठ्या खुबीने आपल्या बाजूला वळवून घेऊन आपलें कार्य त्याने साधलें. चंद्रराव मो-याचा अजिबात काटा काढून इतर प्रतिस्पर्धीं मराठ्यांवर वचक बसविला. तर दुसरीकडे बजाजी निंबाळकराला शुद्ध करून× आपलासा केला. ब्राह्मण, मराठे, कायस्थ अशा साच्या लोकांस एकत्र करून कामाला लाविलें. अशा प्रकारें रजपुतांमधील संघटनेची उणीव महाराष्ट्रामध्ये शिवाजीने राहू दिली नाही.

 (आ) रजपुतांच्या मानापमानाच्या व धर्मयुद्धाच्या कल्पना शत्रुपक्षाच्या मनोवृत्तींकडे लक्ष्य देऊन शिवाजीने बदलून टाकल्या. एखाद्या लढाईत पराभव झाला-नव्हे होणार असें वाटतांच उघड किंवा गुसपणें पळून जाऊन पुढे संधि पाहून शत्रूचा पाडाव करावा, असें धोरण त्याने आखिलें. आपत्प्रसंगीं पुण्याची राजधानी रायगडला किंवा साता-यालाच काय, पण दूर 'जिंजी’ येथे नेऊन स्वातंत्र्याचा लढा चालवण्याची चिकाटी मराठ्यां-


 ×बजाजी निंबाळकर ह्याला अदिलशहाने जुलमाने मुसलमान केलें होतें. हिंदुधर्मदृष्टधा ही गोट खेदकारक होतीच; पण त्याहूनही सामाजिक व राजकीय दृष्टया तें घातुकच होतें. अनेक देवतांची व गुरूंची उपासना ज्या धर्मातील लोक स्वेच्छेनुसार करूं शकतात, त्या हिंदुधर्माला मुसलमानी 'नमाज’ (प्रार्थना) कदाचित्र पचवितां आली असती; परंतु त्या धर्मातरांत शुद्ध मतांतर नसून भ्रष्टता होती. हिंदूंनी अभक्ष्य मानलेले पदार्थ खाल्ल्याखेरीज अर्थात् खाणेंपिणें व चालीरीति, विवाह व वारसाहक्क ह्या बाबतींत एखाद्या माणसाला हिंदुसमाजापासून तोडल्याखरेजि त्याचें धर्मातर पूर्ण होत नसे अर्थात अशा भ्रष्ट माणसाचा ओढा स्वजातीकडून कमी करून आपणाकडे ओढून घेणें व पर्यायाने सामाजिक व राष्ट्रीय फूट पाडून जित समाज दुर्बळ करणें, असा हेतुविधर्मी राजकर्त्यांचा असू शकतो. तो ओळखूनच शिवाजीने मराठा समाजाचें बल वाढवण्यासाठी बजाजी निंबाळकर किंवा नेताजी पालकर इत्यादिकांना शुद्ध करून स्वधर्मात घेतलें असावें.