पान:हिंन्दू सम्राट्.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपति शिवाजी महाराज.

(८३)


 कांही प्रचीति दाखवावी,' अशी देवाची प्रार्थना केली आहे. अशा रीतीने जुलमी राजसत्तेविषयी जो तीव्र असंतोष देशभर पसरत होता, त्यांतूनच आत्मरक्षणार्थ 'स्वराज्य' मिळविलेंच पाहिजे, ही भावना उत्पन्न झाली ! अर्थातूच गरज आणि पुरवठा ह्या तत्त्वाप्रमाणे त्या महान् ध्येयासाठी तळमळणाच्या लाखो लोकांच्या प्रबलतर इच्छाशक्तीने शिवाजीसारख्या विभूतीला निर्माण केलें !

 छत्रपति शिवाजीने जें प्रचंड कार्य केलें, त्याची तयारी त्याचे पूर्वीपासून महाराष्ट्रांत चालूच होती. चेरूळचा पाटील मालोजी भोसले ह्याने नांगर टाकून तरबार घेतली आणि निजामशहाकडून स्वपराक्रमाने मोठी जहागीर मिळवली. त्याचा पुत्र शहाजी हासुद्धा निजामशहाचा सेनापति होता. त्याला हिंदूंची दुर्दशा दिसत होतीच; परंतु कांही काळाने सत्ताधीशांना सुबुद्धि होऊन हिंदु-मुसलमानांचे संयुक्त राष्ट्र देशांत नांदूं लागेल, अशा कल्पनेने शहाजी लहानग्या निजामाचा पक्ष घेऊन मोंगलांशी लढला. परंतु निजामशाहीचे मोंगल बादशहापासून रक्षण होणें आणि हिंदु- मुस्लीम ऐक्य प्रस्थापित होणें ह्या दोन्ही गोष्टी त्याला पुढे अशक्य वाटू लागल्या. निजामशाहीप्रमाणे विजापूरच्या अदिलशाही राजकारणाचाही प्रत्यक्ष नौकरी करून त्याने अनुभव घेतला.

 त्यानंतर बादशाही राजधानीपासून आपण दूर राहून हिंदु संस्कृतीच्या असे विचार त्याच्या मनांत घोळूं लागले.रक्षणार्थ शक्य तो उद्योग करावा, आदिलशहाचा नोकर ह्या नात्याने शहाजी 'विजयनगरच्या हिंदु सम्राटा- वर' स्वाया करीत होता आणि दुसऱ्या हाताने जणू काय शिवाजीच्या भावी हिंदवी स्वराज्याची सामग्री जमवीत होता ! महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन प्रांतांत दोघां पुत्रांना ठेवून पुढेमागे भाऊबंदकी उत्पन्न होऊं नये, इतकेंच नव्हे तर दोघांचें राजकीय एकीकरण होत जावें, अशी त्याची योजना दिसून येते. महत्त्वाकांक्षी भोसले घराण्याप्रमाणे इतरही अनेक