पान:हिंन्दू सम्राट्.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(८२)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

 ह्यानंतर ता० ९|४|१६६९ रोजी औरंगजेबाने बादशाही फर्मान काढून शेकडो पवित्र व सुंदर मंदिरांचा विध्वंस केला. हिंदुस्थानच्या आणि हिंदु जातीच्या इतिहासांत ह्याच्याइतका चीड आणणारा दिवस क्वचितच आढळेल ! लुटीच्या लोभाने किंवा धर्मवेडाने दूरच्या अनेक मुसलमान राजांनी हिंदु मंदिरें व मूर्ति भंगिल्या असतील; परन्तु हिंदुस्थानचा बादशहा म्हणविणान्या राजाला प्रजेच्या धर्मभावना पायाखाली तुडविणारें हे फर्मान काढणें म्हणजे लांच्छन होय ! भूतदयेचें, प्रजावात्सल्याचें आणि राजकीय मुत्सद्देगिरीचें अशा प्रकारें दिवाळें निघाल्यानंतर मोंगल बादशाही- च्या सत्तेला व वैभवाला झपाट्याने ओहोटी सुरू झाली. उत्तरेतील महाराणा राजसिंह प्रभृति शूर व धर्माभिमानी हिंदु राजांनी बादशाहीवर आघात करण्याला सुरुवात केली. बुंदेला राजा छत्रसाल आणि महाराष्ट्रां- तील छत्रपति शिवाजी ह्यांनीही त्यांचाच कित्ता पुढे गिरविला ! त्यामुळे पुढील बादशहा निर्माल्यवत् झाले !

 रामदासांनी तीर्थयात्रा करीत असतां अनेक पवित्र क्षेत्रांना व हिंदु साधुसंतांना दिल्लीच्या बादशाही सत्तेकडून होणारा हा उपद्रव पाहून हिंदूंना जागृत करण्यासाठी आपल्या रसरशीत तीव्र शब्दांनी हाक फोडली-

तीर्थे क्षेत्रें बुडालीं । ब्राह्मण-स्थानें भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला ॥१॥

 अशा संकटकाळीं रामदासासारख्या विरक्त साधूंनाहि 'हिंदुराजा'ची आवश्यकता भासूं लागली.

गनीमाच्या देखतां फौजा रणशूरांच्या फुर्फुरती भुजा ।
ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥ १ ॥

 कविश्रेष्ठ मुक्तेश्वरानेसुद्धा 'पुराणांतील अवतारी पुरुषांच्या वर्णनाची