पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TV । तेवढ्या वेळांत माझे पाठीमागे तुझी मोठा गलबा करून दांडगाई सुद्धां आरंभिली, असें असून कोणी कबूलही करीत नाहीं, सबब तुझा सर्वांस पुनः असें न करण्याची आठवण रहावी ह्मणून थोडासा खाऊ देतो.' असें ह्मणून प्रत्येक मुलास सरसकट एकेक दोनदोन छड्या अधिक उण्या जोराने लगावतो. त्यामुळे मुलें मनांतल्यामनांत कुरकुरतात. पण तसें केल्याखेरीज मास्तरास दुसरा मार्गच नसतो. ही गोष्ट बहुतेक वाचणाऱ्यांस अनुभवाने माहीत असेलच. अशा व कृतीबद्दल आपण मास्तरास नांवें ठेवीत नाही. तर मग एखाद्या घोटाळ्याच्या प्रकरणांत निरुपायामुळे पोलिसाकडून किंवा न माजिस्ट्रेट वगैरे न्यायाधीशांच्या हातून जरबेसाठी असा प्रकार घड्ल्यास त्यांच्या नांवाने काय ह्मणून दगड फोडावे ? मोठ्या अर मारामारीच्या प्रसंगी बेफाम होऊन अनन्वित कृति करणाऱ्या लोकांस ताळ्यावर आणण्यासाठी जेव्हां धरपकड सुरू होते, तेव्हां पोलिसाकडून व त्याचा न्याय करतांना माजिस्ट्रेट वगैरे न्यायाधीशांकडून जरा जोराचा कोर्डा उडाला तर आवेशाने झोटिंगपाच्छाई करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय ह्मणून रडावें? आपण मागला पुढला विचार न पाहतां मनःपूत वागतांना जर कोणास भ्यालों नाही तर पोलिसाचे धक्केबुक्के व माजिस्ट्रेटाचे फटकारे खाण्यास मागेपुढे केले तर कोण सोडील ? दांडग्या लोकांप्रमाणेच सरकारी अमलदार लोक थोडे उग्ररूप धारण करून न वागतील तर ही मारकी उर्मट माणसें कदापि ताळ्यावर यावयाची नाहीत. ह्मणून जशास तसे होणे समयोचित आहे. यास्तव आमच्या हिंदु व मुसलमान बांधवांनी चांगला दूरवर विचार करून असले घात