पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ९३ ) पकडणारे पोलीसच जर न्याय करणारे असते, तर त्याच्या हातून जास्त चुका होण्याचा संभव होता, हे समजूनच सरकाराने न्यायाचे काम पोलिसाकडे न ठेवितां ते अगदी वेगळ्या मनुष्यांकडे ठेविले आहे. ह्मणून तेथे चुक्या होण्याचा संभव कमी असतो. तरी असल्या घोटाळ्याच्या प्रकरणांत कांटेतोल न्याय होणे दुर्घट असते. कारण प्रजेचे संरक्षण होण्यासाठी सर्वत्र शांतता राखणे हे सरकारचे मुख्य काम आहे, त्याचा ज्या कृतींनीं भंग होतो, अशा मोठ्या कलागती व मारामाऱ्या बंद करणे व त्या पुनः न होऊ देण्याचा लोकांस धाक दाखविणे हे फार अगत्याचे आहे. तसे करण्यासाठी एखाद्या प्रकरणांत न्यायाधीशास जोराने छडी उगारावी लागते, ह्मणून त्याला लोक जुलमी ह्मणतात. पण सामान्य व्यवहारांत देखील वचक रहाण्याकरितां जरबेचे प्रयोग केल्याखेरीज चालत नाही, असा अनुभव आहे. विद्याशाळेतील एखादा मास्तर, शांतवृत्तीचा असला तर पोरें त्याला जुमानीनातशी होतात. काही कारणाने जरा तो वर्गाच्या बाहेर पडला की पुरे, पोरें लागलाच मोठा गलबा करून एकमेकांशी दांडगाई सुरू करतात, असा प्रकार चालू झाल्यावर मास्तर क्लासांत येतात, आणि कोणी गलबा केला ही चौकशी करूं लागले असतां सर्वच मुलें नाहीं नाहीं ह्मणतात. त्यामुळे खरा दंगेखोर छपला जातो. पण असला प्रकार घडणे शाळेच्या शिक्षणास हानिकारक असल्यामुळे, विद्याथ्यांनी पुढे तरी असे करूं नये ह्मणून मुलांस स्मरण राहण्यासाठी कठोर उपाय करावा लागतो. ह्मणून मास्तर वर्गात उभा राहून मुलांस उद्देशून बोलतो की 'मी जरा बाहेर गेलों