पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९५ ) कारक दांडगाईचे प्रकार आतां सोडून द्यावे. इतक्याउपर ते न समजतील तर त्यांना ताळ्यावर आणणारे सरकारचे अनेक पंचाक्षरी असल्या भूतपिशाचांस मुक्ति देण्याचे साहित्य घेऊन तयार बसलेच आहेत. ते कदापि सोडणार नाहीत. हे खूप समजून रहावें. कोणी कोणी ह्मणतात की सरकारी अधिकारी मुसलमानांची तरफदारी करतात. पण त्या भरवशावर कोणी विश्वासू नये. कारण अपराध करणारा सख्खा भाऊ किंवा प्रत्यक्ष बाप असला तरी भीड मुरवत न धरितां त्यास पकडतात, आणि खेंचीत नेऊन पोलीसचे लोक त्याला चौकीत अडकवितात. नंतर माजिस्ट्रेट वगैरे न्यायाधीशांपुढे त्यास उभे करून त्याजवर गुन्ह्याच्या शाबिदीचा पुरावा देतात, असे आपण नेहमी पाहतो. तर मग सरकार किंवा सरकारी अधिकारी आमच्या पक्षाचे कैवारी आहेत, असे मानून बेफाम वागणे हे पतंगाने दिव्यावर उडी टाकण्यासारखे आहे; ह्याचा विचार आमच्या मित्रांनी करावा अशी प्रार्थना आहे. पोलीसच्या अधिकाऱ्यांस व न्यायाधीशांस दंगे करणाऱ्या लोकांशी प्रसंगोपात्त निष्ठुरपणाने वागण्याचा प्रसंग येतो, त्या वेळी निरुपायाने ते कठोरपणा करतात, एवढ्यावरून ते मुसलमानांचा किंवा हिंदूंचा द्वेष करतात असें होत नाही. कारण ते कोणाचा द्वेष करते तर जेथे असले प्रकार घडत नाहीत तेथल्या हिंदु किंवा मुसलमानांचा सूड उगवून त्यांणी समाचार घेतला असता, पण तसे कोठेही दिसून येत नाही. त्या अर्थी ते अमक्याचे कैवारी अगर तमक्याचे द्वेषी असा त्यांवर आरोप करणे हे अगदी असमंजसपणाचें