पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२ ) हे त्या वेळी कळण्याचा संभव नसतो. ज्याला विचारावें तो - नाहीं नाहींच ह्मणणार. यामुळे त्या ऐन गर्दीत जो सांपडेल त्याला पकडून पोलीसचौकीत नेऊन अडकविणे भाग पडते. पोलिसाची एकदां धरपकड सुरू झाली ह्मणजे बहुधा गर्दी लौकर मोडते. मग धरलेल्या लोकांत वास्तविक अपराधी कोण आहेत, ह्याचा मुद्दा पत्ता लावून खरे आरोपी असतील त्यांस माजिस्ट्रेटासमोर उभे करतात, आणि बाकीच्यांस सोडून देतात. अशा धरपकडीत निरपराधी लोक देखील कधी कधी गुंतले जातात. असा पोलिसास दोष देऊन कित्येक लोक त्याचे नांवें खडे फोडतात, पण विचार करून पाहिले तर पोलिसाने तरी काय करावें ! तें अंतर्ज्ञानी नाही. आणि तंटे करणारे लोक मारामाऱ्या सुरू करतांना आह्मी अमक्याचे डोके फोडणार अशी पोलिसास वर्दी देऊनही जात नाहीत. अशा निरुपायाने एखादा निरपराधी मनुष्य पोलिसाच्या हातून पकडला गेला, आणि खरा अपराधी पोलिसच्या हातून निसटून गेला, तर त्या खऱ्या अपराध्याने प्रामाणिकपणासाठी पोलिसाकडे हजीर होऊन सांगावें की, अमका मनुष्य तुह्मी धरला आहे तो निरपराधी असल्यामुळे त्यास सोडा, आणि मी अपराधी आहे ह्मणून मला धरा. असें खरेपणाने लोकांनी वर्तन केल्यास पोलिसचे लोक व अंमलदार भलत्याला उगीच कशासाठी पकडतील ? पोलीस हे कोणत्याही मनुष्याचे शत्रू नाही. तें सुकृतीचे रक्षक व दुष्कृतीचे शासक आहे. यामुळे जेथें ज्या व्यक्तीच्या हातून अपराध झाल्याचा सुगावा लागतो, त्या लोकांस पकडून न्यायाधीशापुढे त्यांस नेणे भाग पडते. गुन्हे