पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९१) कृत्ये करतील ह्याचा ताळमेळ राहत नाही. तशांत त्यांजवर मंत्र फुकणारे गारुडी जवळ असल्यास मग तर पुसूच नये. असा प्रकार घडून येण्यास उशीर लागत नाही. मारामारीच्या योगानें जे लोक पोलीसच्या हातीं सांपडून संकटांत पडले आहेत, त्यांनी विचार करून पहावा ह्मणजे वर लिहिल्या त-हेनेच त्यांच्या हातून कृति घडल्या असतील असें ध्यानात येईल. दंगाधोपा न होऊ देतां लोकांत शांतता राखणे, प्रजेच्या जीवाचें व मालमत्तेचें संक्षरण करणे हे पोलिसाचें व सरकारी अधिकाऱ्याचे मुख्य काम आहे. कोणाच्याही हातून कसल्याही कृतीने पोलिसाच्या मुख्य कामास व्यत्यय येऊ लागला ह्मणजे त्यांस उग्र स्वरूप धारण करावे लागते. सामोपचारांनी व तोंडच्या दाबदडपीच्या धाकांनी लोक शांत झाले तर बरे, पण पिसाळलेले लोक त्यास जुमानीनातसे होऊन भडकू लागल्यास त्यांस ताळ्यावर आणण्याजोगे कडक उपाय योजल्याखेरीज चालत नाही. आपसांत होणाऱ्या तंट्यास व मारामारीस कोणच्या ठिकाणी व केव्हां आरंभ होणार हे अगोदर कळण्याचा संभव फार कमी असतो, यामुळे त्या सर्वत्र ठिकाणी पहिल्यापासून पोलीसच्या लोकांस राहतां येत नाही. तंटा सुरू होऊन लबा होऊ लागला, किंवा धोपटाधोपटीस आरंभ झाला, म जे जवळपासच्या पोलिसांस खबर कळते, तेव्हां ते लागलीच याचे जागी येऊन थडकतात. त्या वेळी सामोपचाराने बोल। गली बंद होऊन गर्दी मोडली तर ठीकच. नाही तर त्यांस राधरी सुरू करावी लागते. प्रथम कोणाकडून आगळीक झाली,