पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या कडील लोकांस भान राहीनासें होतें. जे काय हातांत सांपडेल त्या पदार्थाने एकमेकांस बडवीत सुटतात. रागाच्या आवेशांत मनुष्याच्या हातून होणारी कृत्ये अनन्वित झाली तर नवल काय? त्या वेळी मनुष्य देहभानावरच नसतो. यामुळे आपण काय ण करतो, त्या कर्माचा परिणाम काय होईल, हे त्यांच्या लक्षांतच वर्षी रहात नाही. आजवर जेथे जेथें हिंदु व मुसलमान लोकांत तंटे होत होऊन मारामाऱ्या झाल्या त्यांत कोणाची डोकी फुटली, को आहे णाच्या हातापायांस इजा झाली, कित्येकांस बेदम मार बसहवल्यामुळे दवाखान्यांत जावे लागले; अशा इजा झाल्या. त्या व्यक्तीव्यक्तींचें वांकडे असल्यामुळे बुद्धिपुरःसर करण्यांत आल्या असें नाही. केवळ रागाच्या आवेशांत काही तरी हो ऊन गेलें, व कोणास तरी दुखापत झाली. फार कशाला, हर एखाद वेळ घरांतील मुलांच्या किंवा बायकांच्या हातून अज्ञामनामुळे एखाद्या पदार्थाचा नाश झालेला पाहून, किंवा अन्य * कारणाने घरांतल्या कर्त्या पुरुषास राग आला तर तो रा गाच्या संतापाने खवळून लाल होतो, हातपाय आपटून डोळे फिरवितो, ओठ चावतो, आणि तामस प्रकृति असल्यास तो त्या आवेशांत पिसाळून पिशाच्याप्रमाणे बनून में काही हातांत सांपडेल त्या पदार्थाने झणजे काठीनें, भांड्याने, गंधाच्या खोडाने, व प्रसंगी लोखंडाच्या बत्याने सुद्धां बायकापोरांस बडवीत सुटतो. कोणी सोडवायाला गेले तर त्याला देखील त्याच्या माराचा प्रसाद मिळतो. प्रत्यक्ष घरांतल्या माणसाशी रागाच्या भिरकांडींत मनुष्याच्या हातून जर असे दुर्वर्तन होते, तर समुदायाच्या संकेताने एखादे कृत्य करण्यास मनुष्ये प्रवृत्त झालीं ह्मणजे मग काय काय अनन्वित