पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८९) सांपडले झणजे त्याचा सगळा रस गळून त्याचे चिपाड झाल्याखेरीज बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे ह्या मुनीमहाराजांनी एकदां कलहाग्नि पेटविला ह्मणजे त्या वणव्यांत सांपडणाऱ्या लहान थोर सर्व लोकांची राखरांगोळी झाल्याखेरीज सुटका होत नाही. कदाचित् एखादे स्थळी अग्नि विझण्याचा रंग दिसला तर हे महाराज त्याजवर तेल ओतून वारा घालण्यास जवळ उभेच असतात. सगळा गांव जळाला तरी मारुती आपला गांवाबाहेरच ! त्याप्रमाणे हे प्रतापी व विघ्नसंतोषी बुवा दुरून मौज पाहायला तयारच असतात. शहाण्या पुरुषांनी असल्या कलिपुरुषांच्या वाऱ्यास देखील उभे राहूं नये. हिंदु व मुसलमानांत आजवर जे तंटे झाले त्यांत दांडगाई व मारामारी करणारे लोक पोलिसाने पकडले, तरी त्यांतले खरे सूत्रधार अलिप्तच राहिले असतील. कारण ते सक्षात् रंगभूमीवर न येतां पडद्यांतून सूत्राने बाहुली नाचवून नामानिराळे राहतात, ह्मणून ते कदापि हाती लागत नाहीत. एखाद्या पोलीसबहाद्दराने त्यांस पकडण्याचा घाट घातलाच तर ते एखादा छूमंतर सोडून त्या बहाद्दराचीच मान गळाला गुंतवितात. अशी त्यांच्यांत करामत असल्यामुळे त्यांच्या वाटेस कोणी जात नाही. आपसांत होणाऱ्या बहुसमाजाच्या दांडगाईत दोन्ही पक्षांकडचेही लोक पुष्कळ जमतात. त्यामुळे अल्पस्वल्प कारणावरून प्रथम बाचाबाची सुरू होऊन हुमरीतुमरी होते, त्या वेळी कलिपुरुष जवळ असल्यास ते प्रकरण तितक्यावर मिटूं न देतां संतापलेल्या लोकांस चढ देऊन हातघाईवर नेतात. अशा रीतीने एकदां मारपीट सुरू झाली ह्मणजे दोन्ही पक्षां