पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) ह्याचा विचार केला ह्मणजे आतां आपणांस काय केले पाहिजे, कशा रीतीने वागले पाहिजे व एकजुटीने वागून कोणत्या उद्योगांत शिरले असतां आपलें कल्याण होईल, हे लक्षात येण्याजोगे आहे. यास्तव मित्रांनो, आतां आडमार्ग सोडून द्या, आणि सडकेच्या मार्गाने चाला, मणजे तुमचे कल्याण होईल ह्यांत संशय नाही. - जन त्रिविध आहे, त्याने कोणास बरे झटले नाही, ही गोष्ट नेहमी मनांत धरली पाहिजे. ताज्या घोड्याला गोमाशा झोंबतात त्याप्रमाणे आपला चालता काळ असला ह्मणजे सोयरेधायरे, इष्टमित्र वगैरे कसला तरी गणगोताचा संबंध जोडून खायला जुडतात. पण आपणास पडता काळ येऊन विपत्ति प्राप्त झाली ह्मणजे मग कोणी पुसेनासे होतात, हे सर्वांच्या नित्य अनुभवास येत आहे. आपसांत तंटे माजविणाऱ्या हिंदुमुसलमान मित्रांस ह्याचा चांगला प्रत्यय येत असेल यांत भ्रांति नाही. कारण होळीचे होळकर बिचाऱ्या अज्ञान गरीब लोकांस भर देऊन पुढे लोटतात, आणि आपण नामानिराळे होऊन मागें सरतात. त्याचे प्रायश्चित्त गरीब लोकांसच भोगावे लागते. खेडेगांवीं काय, आणि शहरांत काय, कळ लावणारे कळीचे नारद थोडे तरी असतातच. त्यांना तंटे माजवून त्यांची मौज पाहण्याची व साधेल तर त्यांत आपलीं पोट जाळण्याची फार हौस असते, यामुळे ते नेहमी छिद्रे शोधीत असतात. त्यांच्या उद्योगानें तंटा वाढायचा तो न वाढतां आपसांत मिटला तर त्यांची शिकार फसते, तेव्हां त्यांस अत्यंत दुःख होते. एखाद्या गांवांत किंवा शहरांत मोठी साथ येऊन पुष्कळ लोक मरूं लागले ह्मणजे