पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या सोई किती जास्त वाढल्या आहेत ? नवनव्या उद्योगांचा फैलाव किती वेगाने होत आहे, सर्वत्र ज्ञानप्रसारार्थ विद्यालये, वर्तमानपत्रे व छापखाने वाढत आहेत. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार होऊन नवनव्या विषयांवर अनेक पुस्तकांचा भरणा किती वेगाने वाढत आहे, ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षांपूर्वी या हिंदुस्थान देशाची व त्यांतील लोकांची जी स्थिति होती ती बदलून आतां तिला अगदी निराळे स्वरूप येत आहे असे दिसून येईल. अपराध्यांस शिक्षा करून सर्वांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायाची कोर्ट स्थापिली आहेत. त्यायोगाने श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांस न्याय मिळण्याचे चांगले साधन झाले आहे. सडका, पूल, धर्मशाळा, रेलवे, कालवे, पोस्टखातें, विद्यालये, आगबोटी, दवाखाने व तारायंत्रे इत्यादिकांची वृद्धि व सुधारणा होत असल्यामुळे व्यवहारास फार सौकर्य आले आहे. कापसाच्या सुताच्या व कापडाच्या गिरण्या, रेशमी कापडाच्या गिरण्या, चामडी तयार करण्याच्या गिरण्या, कागदांच्या गिरण्या, व अनेक प्रकारची भांडी आणि टांचण्या, सुया, खिळे, व चुका इत्यादि तयार करण्याच्याही गिरण्या सुरू झाल्यामुळे नव्या प्रकारच्या उद्योगांचे शिक्षण इकडील लोकांस मिळत आहे, त्या योगाने जे दृढ उद्योगी, बुद्धिमान व चतुर पुरुष असतील त्यांना आपल्या करामतीने पुढे सरकण्यास मार्ग खुला होत आहे. कोळशाच्या खाणी व सुवर्णाच्या खाणी शोधून त्यांत पुरून ठेवलेले धन बाहेर काढण्याचाही उद्योग मोठ्या झपाट्याने चालला आहे. असे अनेक नवनवे उद्योग इंग्रजी राज्यामुळे आपल्या देशांत सुरू झाले, हे आपलें केवढे भाग्य आहे ?