पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८५) तुझी अज्ञानाच्या धुंदीत मग्न होऊन अद्याप लोळत कसे पडलां! उठा, डोळ्यांस पाणी लावून सावध व हुशार व्हा, ह्मणजे ज्ञानसूर्याच्या प्रकाशाने आतां आपण काय करावें, आणि कसे वागावें हे तुझांस नीट कळू लागेल. मी तुमच्यांतलाच असून तुझा सर्वांचा हितचिंतक असा गरीब देशबांधव आहे; ह्मणून तुमची हानि झालेली पाहिली, किंवा ऐकिली झणजे मला अत्यंत वाईट वाटते. आणि तुझांस लाभ झालेला पाहिला किंवा ऐकिला ह्मणजे परमानंद होतो. असा मी तुमचा हितचिंतक गरीब सेवक आहे. तरी तुमचे सर्वकाळ, सर्व ठिकाणी व सर्व कृत्यांत कल्याण होऊन तुह्मांस यशप्राप्ति व्हावी असे मी चिंतीत आहे; ह्मणून अशा गरीब सेवकाच्या विनंतीचा अव्हेर न करितां तुह्मी चांगला विचार कराल अशी फार आशा आहे, ती पूर्ण करणे आपणांवरच आहे. आपलें पूर्ववैभव नष्ट होऊन गेलें तरी ज्या इंग्रजी राजसत्तेखाली आज आपण आहों ते लोक फार शहाणे, उद्योगी, धारिष्टवान, प्रजापालक, दयाळू, सुधारणेच्छू, व्यवहारज्ञ व दूरदृष्टि असल्यामुळे आपणांस पुष्कळ सुख होत आहे, आपल्या जीवाची व मालमत्तेची इंग्रजी राज्यांत कोठें भीति राहिली नाही. प्रामाणिकपणाने कोणताही उद्योग केला तरी कोणाचा प्रतिबंध होत नाही. व तशा उद्योगाने कितीही धन संपादन केले तरी कोणी सरकारी अधिकारी किंवा दुसरा एखादा बलाढ्य जबरदस्तीने तें लुटून नेईल ही भीति नाही. दुष्टांचे शासन व सुष्टांचे पालन इंग्रजी राज्यांत सर्व ठिकाणी उत्तम प्रकारे होत आहे. इंग्रजी राज्य झाल्याने पूर्वीपेक्षा व्यवहारा