पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TO IP' आली असून सर्वस्वी पराधीन होत्साते हलक्या अन्नवस्त्रास देखील महाग झालों ह्याची लाज नाही का वाटत ? तुमचा विचार कोठे गेला ? तुह्मी आपला सगळा अभिमान, सगळे बळ, सगळा वेळ, आणि सगळे चातुर्य आपसांत तंटे व मारामाऱ्या करण्यांतच खर्च करणार काय? असली या'दवी कृति तुमचा सर्वस्वी नाश करील. तुमच्या घरादाराचें वाटोळे करून त्याजवर नांगर फिरवील. तुमची बायकापोरें उघडी व निराश्रित पाडून धायधाय रडत फिरवील. परके लोक छी थू करून तुह्मांस नीच मानतील. तुमचा बोज नाहीसा होऊन तुमच्यावर कोणी भरंवसा न ठेवितां आपल्या जोड्याजवळ देखील उभे करिनासा होईल. ही गोष्ट अद्याप तुमच्या मनांत कशी भरत नाही हे महदाश्चर्य आहे. असो. आजवर होऊन गेल्यागोष्टीचा शोक करणे व्यर्थ आहे, तरी पुढील बचावासाठी त्यापासून आपणास बोध करून घेणे हे शहाणपण होय, यास्तव आतां उभयपक्षांनी शांत व्हावें. आपसांतील यादवीचा त्याग करून एकमेकांतलें वैर टाकावे, आणि सुविचाराने व ऐक्याने वागून कल्याणाच्या मार्गास लागावे, हेच उत्तम होय. जरा डोळे उघडून पहाल तर आज बाहेर काय चालले आहे, त्यायोगानें उद्योगी, दीर्घदृष्टी, शहाणे व दृढनिश्चयी असे परकी लोक मोठ्या हिमतीने झटून सर्व कामांत पुढे कसे सरसावताहेत, आणि आपण आळशी, हालमस्त व वृथाभिमानी होऊन वेडेपणाच्याच कृति करीत बसल्यामुळे कसे मागे हटत चाललों आहों हे स्पष्ट दिसून येईल. आतां ज्ञानसूर्य उगवून फार वेळ झाल्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरला आहे. असे असतां