पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बेटीव्यवहार होत नाही. तथापि एवढ्या भिन्नतेशिवाय इतर एकंदर व्यवहारांत एकमेकांचा परस्परांशी कोणत्याही गोष्टींत भिन्नभाव किंवा विरोध बिलकूल असत नाही. ते सर्व लोक एकमेकांशी सलोख्याने वागून बंधुप्रेमास उचित अशा ममतेने एकजुटीने चालतात. ही गोष्ट आमचे प्रियकर मुसलमान बांधव पूर्णपणे जाणत आहेत. ही केवळ एकधर्मी लोकांची गोष्ट आहे. पण वर सांगितलेले पारशी, यहूदी व क्रिश्चन बांधवांचा मुसलमान बांधवांप्रमाणेच सर्व प्रकार असून त्यांचा हिंदु लोकांशी आजवर कधी तंटाबखेडा झाला नाही. पण त्यांचे व हिंदूंचे अनेक व्यावहारिक गोष्टींत सख्यच वाढत आहे. त्यायोगाने होणाऱ्या आनंदाचा उपभोग ते उभयतां यथेच्छ घेत आहेत. आमचे मुसलमान बांधव ही गोष्ट चांगली समजतात. असली प्रत्यक्ष व उघड घडणारी बिना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असून आमचे मुसलमान बांधव अद्याप उमजत नाहीत यास काय ह्मणावें ? दुर्दैव दोघांचे !!! असो. प्राचीनकाली हिंदु व मुसलमान लोकांमध्ये वागणूक कशी होत होती, व अद्याप देखील कित्येक ठिकाणी हिंदु व मुसलमान हे एकमेकांशी कसे वागत आहेत, व त्यायोगानें परस्परांच्या व्यवहारांत सौकर्य येऊन उभयपक्षी कसकसे लाभ होत आहेत, हे प्रत्यक्ष उदाहरणांनी दाखवितो. ह्मणजे त्यावरून आमच्या प्रियकर मुसलमान बांधवांची खात्री होईल.