पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) बूल करतील. ह्मणून हिंदु लोक जशी आर्यभूमातेची लेंकरें, त्याचप्रमाणे मुसलमान लोकही आर्यभूमातेची लेंकरेंच होतात. यासंबंधाने पाहिले तर हिंदु व मुसलमान ही दोन्ही सख्खी भावंडे होतात. एका आईच्या पोटची मुले स्वभावानें, गुणानें व मताने सगळी सारखींच निपजतात असा नियम नाही. कारण जितक्या मूर्ति तितक्या प्रकृति असावयाच्या. त्याप्रमाणे हिंदु आणि मुसलमान यांची धर्ममतें, आचार व आहार हे भिन्न आहेत. ह्मणून तितक्यापुरते परस्परांनी एकमेकांपासून खुशाल पृथक् राहावें, त्याबद्दल कोणाची तक्रार नाही. पारशी, यहूदी व क्रिश्चन लोक ह्यांचीही मुसलमानांप्रमाणेच धर्ममतें, आचार आणि आहार ही हिंदु लोकांपेक्षां भिन्न असून तेही या देशांतलेच रहिवासी झाले आहेत. त्यांचा आणि हिंदूंचा जेवढ्या गोष्टींत भिन्न भाव आहे, तितक्यापुरते हिंदूंशी ते पृथक्पणे वागून बाकीच्या व्यावहारिक सर्व गोष्टीत ते हिंदु लोकांशी एकोपा ठेवून सलोख्याने वागतात. त्याप्रमाणे मुसलमान बांधवांनीही हिंदु लोकांशी जितक्या गोष्टींत भिन्नपणा आहे तेवढ्या शिवायकरून बाकीच्या व्यावहारिक सर्व गोष्टींत हिंदूंशी तुटक न राहतां एकोप्याने वागावें हें रास्त आहे. असला, काही गोष्टींत भिन्नपणा, व बाकीच्या सर्व गोष्टींत एकोपा, हा प्रत्यक्ष हिंदु लोकांच्या अनेक जातींत दृष्टीस पडतो. पहा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्मार्त व वीरवैष्णव, इत्यादि सर्व जाती हिंदुधर्मी आहेत. त्याचप्रमाणे लिंगाईत व जैन असून त्यांची धर्ममतें व जाती भिन्न असल्यामुळे त्या परस्परांचा एकमेकांशी अन्नव्यवहार व