पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग दुसरा. शहाणे हिंदु व मुसलमान लोक परस्परांशी पूर्वी कसे वागत होते, व हल्लीही कसे वागत आहेत. या देशांत मुसलमान लोकांचे राज्य स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष दिल्लीच्या हुजूरदरबारांत व त्या राज्यांतील बाहेरगांवच्या अनेक ठिकाणी हिंदु लोक लायकीप्रमाणे लहान मोठ्या अनेक हुद्यांवर नेमले जात, व त्यांचे हातून सरकारी कामेही प्रामाणिकपणाने व बिनचुक अशी होत असत. - अकबर नामें बाहशाहा दिल्लीच्या गादीवर पूर्वी होऊन गेला. त्याच्या शहाणपणाच्या व निस्पृहतेच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्याने कोणत्याही धर्माचा तिरस्कार केला नाही, व परधर्मी लोकांवर जुलूम करून मुसलमानी धर्मांत ओढून आणण्याचे साहसही केले नाही. हिंदु लोकांवर त्याची फार मेहरबानी असे. त्याच्या कारकीर्दीत लष्करी व मुलकी कामांत मोठाल्या हुद्यांवर हिंदु लोक असत. 'राजा तोडरमल' या नांवाचा हिंदु गृहस्थ हा जमाबंदी खात्यावर मुख्याधिकारी असून त्याने जमिनीची मोजणी करून तिचे दरही ठरविले अशी प्रसिद्धि आहे. 'ऐन-ई-अकबारी' ह्या नांवाच्या फारशी ग्रंथांत याबद्दल खुलासेवार वर्णन आहे. अकबराने मोठ्या नीतीने राज्यकारभार चालवून सर्व रयतेचा व इतर सर्व लोकांचा दुवा मिळविला. तो मरून गेल्यास बराच काळ लोटून गेला तरी अद्याप त्याची कीर्ति नष्ट न होतां ती अजरामर होऊन राहिली आहे, ही गोष्ट आमचे मुसलमान बांधव पूर्णपणे जाणत आहेत. १ अकबराच्या कारकीर्दीचे नियम.