पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८३ ) भाग ४ था. हिंदु व मुसलमान लोक परस्परांशी दांडगाई व मारामाऱ्या वगैरे करतात, त्यापासून कोणास कांहीं लाभ होतो किंवा हानि होते? आपसांत तंटे माजवून वैर वाढल्यास त्याचा किती भयंकर परिणाम होतो, हे वरील अनेक उदाहरणांवरून मित्रांच्या लक्षात आलेच असेल. 'हातचे कांकण पहाण्यास आरसा नको.' भांडणाने हानि होत हे सांगण्यास ज्योतिषी किंवा भविष्यकार नको. ज्यास बुद्धि आहे, व विचार करण्याचे सामर्थ्य आहे, त्या सर्वांस ही गोष्ट सहज कळण्याजोगी आहे. असे असतां हिंदु व मुसलमान लोक अजून कां उमजत नाहीत, हे मोठे आश्चर्य आहे. आमचे हिंदु व मुसलमान बांधव मूर्ख व अशिक्षित नाहीत. उभयवर्गामध्येही बहुश्रुत विद्वान, धर्मनिष्ठ, पोक्त, अनुभवी, उद्योगी, सन्मान्य, परोपकारी व पापभीरु असे लोक आहेत, हे मी जाणतों. त्या सर्वांस मी अनन्यभावें प्रार्थना करून विनवितों की, बाबांनो, हिंदु व मुसलमान वगैरे सर्वांनी एकदिल होऊन आज ज्या गोष्टी अवश्य करण्याजोग्या आहेत त्या टाकून ह्या तंटे करण्याच्या फंदांत कां पडतां ? आधीच दुर्दैवाने आपणा उभयतांस किती नाडले आहे, हे तुमाला समजत नाही का? आपण पूर्वी कोणत्या स्थितीत होतो, त्या आपली आज काय दशा झाली आहे हे जाणत नाही का? ज्यांचे पूर्वज राज्यसुख भोगीत होते, त्यांचे वंशज तुझी