पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८१) इतिहासानें भारत भरलें सांगावें तरि कोठवरी ॥ चाल वेगळी-जरि देते कौरव पांच तया गांव ॥ तरि कशास बुडतें कौरव हे नांव ॥ कां प्रसिद्ध होते पांडव ते देव।। विदुरे कृष्ण बहुत बोधिलें दुर्योधन नाहीं वळला ॥ कळला भवला परिणाम पुरा अखेर ह्मणति प्रभुसत्ता ॥ १ ॥ पुराणांत दृष्टांत असे बहु बघणाराला आढळती ॥ भाउबंदकी महाघातकी दुष्ट अशी चित्ता कळती ॥ किती नाश जाहला हिजमुळे बघून चित्तीं तळमळती ॥ प्रसंग असला कधी न येवो ह्मणून सज्जन हे पळती ॥ असे उघड दाखले असुनिहि भलत्याची कां मति वळती॥ पुनः पुनः फसतात मूर्ख ते निश्चय त्यांचे डळमळती ॥ चाल-राघोबादादा शूर पेशवे कसे ॥ कां झालें त्यांचे नगांत साऱ्या हसें । स्त्री भाउबंदकीसाठी त्यांवर रुसे ॥ प्रभु नारायणराव मारिले आनंदीने ह्याकरितां ॥ पुण्यांतुनी पाऊल निघालें तोटा कुठला ह्यापरता॥२॥ थोर थोर तरि किती घराणी गेली कैशी रसातळा ॥ संभाजीनें माता वधिली पहा कसा दिवटा पुतळा ॥ चुलत्या अल्लाउदिने वेधुनि दोष लाविला आत्मकुळा ॥ नाम मात्र राहिले पहाना इतिहासामधिं पडताळा ॥ भाउबंदकी आणुनि चित्तीं भावाचा कापिती गळा ॥ कर्मे ऐसी करुनि लाविती भाळी अपकीर्तीचा टिळा ॥ चाल-भूपती असे हे किती निपजले पहा ॥ ह्या हिंदुस्थानी किती जाहले शहा ॥ हे समजुनि उमजुनि १ ही गोष्ट १६८० मध्ये घडली. २ ही १२९५ त घडली.